महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वर्धा जिल्हा अधिवेशन थाटात संपन्न
दिनांक 25 एप्रिल 2026 ला केसरीमल कन्या शाळा वर्धा येथील शाळेच्या निसर्ग रम्य पटांगनावर संध्याकाळी पार पडले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष वर्धा जिल्हया चे अध्यक्ष श्री. सुधीर राठोड, कार्यक्रमाचे उदघाटक मा. श्री. सुमितभाऊ वानखेडे आमदार आर्वी विधानसभा, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मा. सुधीरभाऊ पांगुळ नगराध्यक्ष वर्धा नगर परिषद. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. राजेशभाऊ बकाने आमदार देवळी -पुलगाव विधानसभा, मा. श्री. नागो गाणार सर माजी शिक्षक आमदार नागपूर विभाग तथा राज्य कार्याध्यक्ष, मा. श्री. सुधाकरराव कोहळे माजी आमदार नागपूर, मा. सौ. पुजाताई चौधरी राज्य महिला आघाडी प्रमुख, मा. श्री. अजय वानखेडे नागपूर विभाग अध्यक्ष, मा. श्री. सुभाषजी गोतमारे नागपूर विभाग कार्यवाह, मा. श्रीमती संध्याताई पुरेकर कार्यवाह विमेन्स एज्युकेशन सोसायटी वर्धा. मा. सुधीरजी वारकर विभाग कार्यालय मंत्री, मा. राहुलजी चोपडा उपनगराध्यक्ष नगर परिषद देवळी, मा. मनीषाताई साळवे सहकार्यवाह नागपूर विभाग, मा. डॉ. सौ. रत्नाताई चौधरी सह महिला आघाडी नागपूर विभाग, मा. श्री. मिलिंद सरोदे सदस्य नागपूर विभाग कार्यकारणी, मा. सौ. धनिष्ठाताई बोरुटकर प्राचार्या केसरीमल कन्या शाळा वर्धा, मा. सौ. अनघाताई अगवन वर्धा जिल्हा मार्गदर्शक, मा. श्री. नरेश्चंद्र वाळके माजी मुख्याध्यापक तथा जिल्हा मार्गदर्शक मंच्यावर उपस्थित होते.
या अधिवेशनात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षक पात्रता परीक्षेपासून 2013 पूर्वी लागलेल्या शिक्षकांना सूट देणे, आश्वासित प्रगती योजना शिक्षकांना सरसकट लागू करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, बालसंगोपन रजा संदर्भात शासन निर्णय निर्गमित करणे, प्रलंबित शालार्थ आय. डी. प्रकरणे निर्गमित करणे, शिक्षकांना वैद्यकीय कॅशलेस योजना लागू करणे, 15 मार्च 2024 चा अशैक्षणिक शासन निर्णय रद्द करणे या सर्व विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
उपस्थित मा. वानखेडे व मा. बकाने या दोनीही आमदार महोदयांनी शिक्षकांच्या मागण्या विधानसभेत तसेच योग्य व्यासपीठावर मांडणाची हमी दिली. श्री. पांगुळ यांनी विध्यार्त्याचे मन, मनगट, मस्तीष्क, शिक्षकांनी बळकट करावे असा मोलाचं मार्गदर्शन केले. अधिवेशनाचे अध्यक्ष श्री. सुधीर राठोड यांनी संघटन मजबुतीसाठी सर्व शिक्षकांनी एकत्र येण्याचा तसेच शिक्षकांच्या समस्या कश्या वाढत चाललेल्या आहे. यावर प्रकाश टाकला. तसेच या समस्या सोडविण्यासाठी आपण कसोशीने प्रयत्न करू असे सभेला सांगितले.
या कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्यातील आठही तालुक्यातील जवळपास दोनशे पन्नास शिक्षण क्षेत्रातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी व शिक्षण क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते. या अधिवेशनाचे संयोजक जिल्हा कार्यवाह मा. श्री. मारोती सयाम तसेच सह संयोजक मा. श्री. प्रदीप झलके हे होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. सौ. अर्चनाताई धानोरकर यांनी केले. सभेसमोर जिल्हा कार्यवाह अहवाल श्री. मारोती सयाम यांनी सादर केला तर जिल्ह्याचा अहवाल वाचन कु. शुभांगी ताई चिकटे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार मा. माधुरीताई देशमुख यांनी केले. या अधिवेशनासाठी शिक्षक परिषदेचे श्री.दिपक ढगे, कॅ. मोहन गुजरकर, सुरेश रोठे, कपिल ठाकूर,प्रमोद गुडधे, रविंद्र उईके, सौ. सुरेखा नगराळे, विठ्ठल धोटे, अनंत भाकरे, हेमंत माटे, पवन निनावे, प्रफुल गरड, प्रवीण गजभिये, महेश मसराम, कु. दिशा चौधरी, सौ. छाया पाहुणे, सौ.लता हेडाऊ, सौ. सुलभा कडू, सौ. प्रेमलता कोहळे, सौ. सुजाता जोशी, सतीश झाडे, नितीन लोहकरे, अनिल चौधरी, सौ. वर्षा गेडाम, स्वप्निल सावदे, प्रवीण कडू, देवेंद्र गडेकर, मोहन गलांडे, विनोद वाटाने, मनोहर कोल्हे, धनराज खवशी, समीर चोरे, नंदकिशोर गोडबोले, प्रफुल पुनसे, संतोष उमाळे, सौ. अर्चना पुनसे, शैलेंद्र डफर, रवी शिरभाते, गोवर्धन इंगळकर, महेंद्र सांभारतोडे, गिरीश आजने, सौ. मंजुषा गजाम, सुनील ढानगे, हेमंत भुरे, अनिकेत कावळे, सौ. रेणुका मोरे, सौ अरुणा चरडे, दत्तात्रय कुबडे, बालाजी आडे, राकेश गौर, मनोज बंडवाल, सौ. संध्या उमरे, कमलेश पगारे, मदन चरपे, विक्रांत वानखेडे, खुशाल धोटे, सौ. सुनीता गहुकार, सौ. शिल्पा चरडे, ओमप्रकाश मुडे, गजानन साळवे, प्रमोद जामूनकर, सौ. सुधन भगत, रामाणंद चौधरी, लालबहादूर यादव, प्रकाश तिमांडे, मनीष देशमुख, श्रीमती प्रतिमा भोयर, संतोष नागरे, शरद बोके, घनश्याम ढाले, विजय चौधरी, सौ. इंदिरा डोंगरे, विक्रमसिंग चौहान, यांनी मोलाचे सहकार्य करून हे अधिवेशन यशस्वी केले.


