महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर

संच मान्यता 2025 – 26 नुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन पारदर्शिपणे व शांततेत पार.

मा. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक नागपूर यांचे उपस्थितीत समायोजन प्रक्रिया पारदर्शीपणे, शांततेत पार पडली. याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शिक्षण विभाग, जिल्हा परिषद (माध्य), नागपूर यांचे मा. शिक्षणाधिकारी श्री अनिल दहिफळे यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. 💐💐💐

दिनांक 16 एप्रिल 2026 पासून सुरू होणारी समायोजन प्रक्रिया पारदर्शीपणे व शिक्षकांचा सन्मान जपून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी, मा. श्री नागो गाणार सर यांनी रिक्त पदांची यादी प्रसारित करण्याची सूचना वजा विनंती केली होती.
मा. शिक्षणाधिकारी यांनी समायोजनापूर्वीच रिक्त पदांची यादी जाहीर केल्यामुळे समायोजन प्रक्रियेत उपस्थित असलेल्या प्रत्येक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपला शाळा निवडीचा विकल्प आधीच निवडून ठेवता आला.
मा. शिक्षणाधिकारी यांच्या संयमी व योग्य निर्णयामुळे तसेच उपस्थित उपशिक्षणाधिकारी मा. सुजाता दशमाने मॅडम, मा. श्री प्रवीण कांबळे, मा. श्री सतीश हरडे, मा. श्री. सतीश आसोले, मा. श्री. वासे तसेच इतर सर्व सहभागी मा. कर्मचारी वर्ग यांच्या संयमी सहकार्यामुळे दिनांक 16, 17, व 20 एप्रिल तीन दिवस ( सकाळी 9:00 ते उशिरा रात्री पर्यंत ) सलग चाललेली समायोजन प्रक्रिया शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान जपत नी:पक्षपातीपणे / पारदर्शिपणे व शांततेत यशस्वीरित्या पार पडली.
या प्रसंगी नागपूर विभाग कार्यालय मंत्री श्री सुधीर वारकर, शहर अध्यक्ष श्री राजेंद्र पटले, कोषाध्यक्ष श्री सुनील शेळके, सहकार्यवाह सौ. माहेश्वरी कोडापे तसेच शहर व ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.
पुनश्च महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शिक्षण विभाग, नागपूर जिल्हा परिषद, नागपूर यांचे खूप खूप अभिनंदन. व भरघोष शुभेच्छा.
पुढील काळातही अशीच पारदर्शी व भ्रष्टाचार मुक्त प्रक्रिया राबवल्या जातील अशीच अपेक्षा.

💐💐💐🙏🙏🙏

नागपूर शहर कार्यवाह
प्रमोद बोढे. 🙏💐🙏💐

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *