महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग पदाधिकारी यांचा फलटण तालुका संपर्क दौरा.

फलटण…. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाच्या वतीने फलटण शहरातील प्रसिद्ध मुदोजी हायस्कूलला भेट दिली सदर विद्यालयाचे मुख्याध्यापक शेंडगे सर शिक्षक यांना शिक्षक परिषदेची ओळख तसेच “माझी शाळा माझा अभिमान” या उपक्रमाविषयी माहिती दिली. शिक्षक परिषद करत असलेली… शिक्षक हित, शिक्षण हिताची कामे सांगितली. तसेच फलटण शहरातील यशवंतराव चव्हाण हायस्कूल व जुनिअर कॉलेज येथील शिक्षकांशी संवाद साधून शिक्षक परिषदेविषयी माहिती दिली. दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालय व जुनिअर कॉलेज या विद्यालयास भेट देऊन शिक्षक परिषदेची माहिती दिली सदर दौऱ्यामध्ये पुणे विभागाचे कार्यवाह डॉ. बाळासाहेब चोपडे कार्याध्यक्ष भास्कर कुंभार सहभागी झाले. होते. शिक्षक हित, शिक्षण हित व राष्ट्रहितासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *