महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन परिषद ,पुणे येथे आय.सी. टी विषय 5 वी पासून स्वतंत्र शिकविण्यात यावा. तसेच दहावी बोर्ड परीक्षेसाठी पूर्ववत सुरू करावा. याचिका कर्ते यांचा अहवाल तत्काळ शासनाला सादर करावा यासाठी *संचालक हेमंत वसेकर* यांना आय. सी टी शिक्षक संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे महानगराचे कार्यवाह मा.विष्णू मोरे सर, आय.सी.टी शिक्षक संघटनेचे सुशांत लुगडे सर,सचिन पाटील सर,मनोज कांबळे सर,कविराज पाटील सर,किशोर यादव सर,अनुप रेडेकर सर उपस्थित होते.