प्रलंबित कामे पूर्ण करा…. शिक्षक परिषदेची मागणी….. उपसंचालक यांची शिष्टमंडळाने घेतली भेट कोल्हापूर …………..महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाच्या वतीने कोल्हापूर उपसंचालिका सौ कोळेकर मॅडम यांना आपल्या अधिनस्त असलेल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षक शिक्षकेतर सेवकांची अनेक कामे प्रलंबित आहेत त्यामध्ये फंडाच्या स्लिपा, मेडिकल बिले, विविध प्रकारची थकीत बिले, पेन्शन प्रकरण, बढती मान्यता या सर्व प्रकारच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांचे बरोबर व आपणही महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची सहविचार सभा बोलवावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाच्या शिष्टमंडळाने एका निवेदनाद्वारे केली. सदर शिष्ट मंडळामध्ये पुणे विभागाचे कार्यवाह डॉ. बाळासाहेब चोपडे सांगली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष भास्कर कुंभार जिल्हा कार्यकारणी सदस्य डी एन भोसले .राजेंद्र रावळ. भरत कांबळे व पदाधिकारी उपस्थित होते 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *