*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर शहर जिल्हा**
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मा. शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांचे सह विचार सभा संपन्न*
आज दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी, सेंट उर्सूला हायस्कूल येथे माजी आमदार, राज्य कार्याध्यक्ष मा.श्री. नागो गाणार यांच्या उपस्थितित मा. शिक्षणाधिकारी यांच्या सह सहविचार सभेत शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यात आल्या.
1) अधिकारी व लिपिकांवर निर्धारित केलेल्या कामाची माहिती दर्शक फलक लावण्यात येणार आहे याची हमी देण्यात आली.
2) सेवा हमी कायदा 2015 अन्वये शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी तंतोतंत करण्याची हमी दिली.
3) दरमहा एक तारखेलाच वेतन मिळणार.
4) प्रलंबित असले थकीत वेतन देयके, वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती, अर्जित रजेचे रोखीकरण काही प्रकरणे पूर्ण करण्यात आली उर्वरित प्रकरणे तात्काळ पूर्ण करण्याची हमी देण्यात आली.
5) अनुकंपा नियुक्ती, मान्यता, शालार्थ आयडी, सेवा जेष्ठता सदर प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यात येण्याचे आश्वासन देण्यात आले. ज्या शाळांनी अनुकंपांचे प्रस्ताव पाठवलेले नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली.
6) द्विप्रत सेवापुस्तिका व सेवानिवृत्ती पूर्ण केलेले व प्रलंबित असलेले प्रकरणे.
7) वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी, वैयक्तिक मान्यता, खाते मान्यता, मंडळ मान्यता , इत्यादी बाबींवर चर्चा करून बहुसंख्येने प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यात आली. उर्वरित थोडीफार प्रकरणे तात्काळ पूर्ण करण्यात येईल अशी हमी देण्यात आली.
8) प्रशासकीय कार्य सुकर करण्यासाठी तसेच मुख्याध्यापक, लिपिकांच्या अडचणी सोडविण्याच्या हेतूने आवश्यक असणाऱ्या सर्व प्रकारच्या प्रस्तावांसाठी कोण कोणती कागदपत्रे जोडावी याची हस्तपुस्तिका उपलब्ध करून देण्याचे आश्वाषन दिले.
9) ऑनलाइन कामे सुकर होण्याच्या दृष्टीने मुख्याध्यापक व लिपिक यांची कार्यशाळा घेण्याचे आश्वासन मा. शिक्षणाधिकारी यांनी सभेदरम्यान दिले. त्याचप्रमाणे उर्वरित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
10) शाळेच्या दस्तऐवजाची सुरक्षा व अधिकारी याबाबत चर्चा करताना मा. शिक्षणाधिकारी यांनी गंभीरपणे विचार करून निर्णय घेण्याची हमी दिली.
या सभेला राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजा चौधरी, नागपूर विभाग अध्यक्ष श्री अजय वानखेडे, कार्यवाह श्री सुभाष गोतमारे, कार्यालय मंत्री श्री सुधीर वारकर, नागपूर शहर अध्यक्ष श्री राजेंद्र पटले, कार्यवाह श्री प्रमोद बोढे, सहकार्यवाह सौ माहेश्वरी कोडापे, कोषाध्यक्ष श्री सुनील शेळके, संघटन मंत्री श्री रुपेंद्र बसे शंकर, नागपूर शहर महिला आघाडी प्रमुख डिंपी बजाज, नागपूर ग्रामीण अध्यक्ष श्री मीनानाथ सातपुते, कार्यवाह श्री तांदूळकर त्याच प्रमाणे नागपूर शहर तालुका व ग्रामीण तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी सभेला उपस्थित होते.
मा. सातपुते सरांनी सभेला उपस्थितांचे आभार मानले.
अल्पोपहार व चहा घेऊन सभा समाप्त करण्यात आली.
नागपूर शहर कार्यवाह
प्रमोद बोढे
