*महाराष्ट्र* *राज्य* *शिक्षक* *परिषद* *नागपूर* *विभागाची* *बैठक* *संपन्न*

प्रतिनिधी.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाची बैठक नागपूर येथे पंडित बच्छराज व्यास विद्यालय,राजाबाक्षा येथे दिनांक ९ आगष्ट सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अजय वानखेडे विभाग अध्यक्ष तर प्रमुख अतिथी म्हणून माजी शिक्षक आमदार नागो गाणार,पुजाताई चौधरी राज्य महिला आघाडी अध्यक्षा, सुभाष गोतमारे , संतोष सुरावार, सुधीर वातकर, रामदास गिरटकर आणि रंजना कावळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन आणि मालार्पन करण्यात आले.

बैठकीत मागील सभेचे इतिवृत्त वाचुन कायम करणे, जिल्हा कार्यवाह यांचा अहवाल, शिक्षणाधिकारी यांचे कडील सहविचार सभा, वार्षिक सदस्य नोंदणी चर्चा व नियोजन, मेळावा, अधिवेशन आणि महिला सम्मेलन, नागपूर विभाग पदवीधर निवडणूक व मतदार नोंदणी प्रक्रिया अहवाल व चर्चा आदी अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेवटी वंदेमातरम गिताने शेवट करण्यात आले.

सभेला विभागातील सर्व जिल्हांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *