महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मराठवाडा विभागाची वार्षिक नियोजन बैठक सोमदरा गुरुकुल डोमरी तालुका पाटोदा जि बीड येथे संपन्न झाली. आजच्या नियोजन बैठकीत संघटनेचा वाढ आणि विस्तार, सभासद नोंदणी, क्लस्टर योजना, वार्षिक हिशोब आदी विषयावर विस्तृत चर्चा आणि निर्णय करण्यात आले.
तसेच शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रश्न म्हणजे टप्पा अनुदान, जुनी पेन्शन योजना, संचमान्यता, TET संदर्भात पाठपुरावा, आश्वासित प्रगती 10/20/30योजना, अतिरिक्त कर्मचारी आणि त्यांचे समायोजन, 11वी प्रवेश आणि ग्रामीण भागातील प्रवेशाची परिस्थिती,सध्यपरिस्थितीत शिक्षण व्यवस्थेबद्दल शासनाचे धोरण आणि भूमिका, जिल्हापरिषद शिक्षकांचा मुख्यालयी राहण्याची समस्या आणि सोडवणूक,मराठी शाळांची गळती आणि इंग्रजी माध्यमाचे फुटलेले पेवं आदी महत्वाच्या ज्वलंत विषयांवर चर्चा होऊन पुढील दिशा ठरविण्यात आली. प्रसंगी बैठकीचे नियोजन विभागाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब साळवे, विभाग कार्यवाह सुरेश पठाडे, विभाग कोषाध्यक्ष श्री विजय होपळे तसेच बीड जिल्हा कार्यकारिणी यांनी केले. प्रसंगी राज्याचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, संघटनमंत्री किरण भावठाणकर, पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार तथा राज्य कार्याध्यक्ष श्री भगवान आप्पा साळुंखे, राज्य कार्याध्यक्ष गणेश पवार, राज्य कार्यकारिणी सदस्य श्री नंदकुमार झरीकर, जी एच लदाफ, विभाग कार्याध्यक्ष श्री अनिल घायवट, विभाग कार्याध्यक्ष बाळासाहेब देशपांडे, उपाध्यक्ष मराठवाडा अविनाश भवर महिला आघाडी विभाग प्रमुख ज्योती महाजन, राज्यविस्तारक मधुकर कुलकर्णी, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, कार्यवाह, कोषाध्यक्ष, महिला आघाडी, उपाध्यक्ष सहकार्यवाह आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *