शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांच्या संवेदनशीलतेमुळे विज्ञान परिचर संदीप ढोबळे यांना अखेर न्याय!
शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश

पुणे जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या संवेदनशील, पारदर्शक आणि तत्पर कारभारामुळे संगमेश्वर विद्यालय पारगाव शिंगवे येथील विज्ञान परिचर संदीप सिताराम ढोबळे यांना अखेर अनुकंपा नियमित वैयक्तिक मान्यता मिळाली आहे. तांत्रिक कारणामुळे प्रलंबित असलेल्या या प्रकरणावर सकारात्मक निर्णय घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी ही मान्यता प्रदान केली. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळे शिक्षण वर्तुळातून डॉ. कारेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. विज्ञान परिचर संदीप ढोबळे हे प्रशासकीय दिरंगाईमुळे मोठ्या आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात होते.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष श्री. निलेश काशिद, कार्यवाह शिवहार लहाने व आंबेगाव तालुकाध्यक्ष विजय साळवे यांनी शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांची भेट घेऊन ढोबळे यांच्या व्यथेची वस्तुस्थिती मांडली. डॉ. कारेकर यांनी वस्तुस्थिती तपासून आणि नियमांच्या अधीन राहुन एका दिवसात नियमित मान्यता दिली. शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या या कौतुकास्पद आणि न्यायप्रिय भूमिकेबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण व आंबेगाव तालुक्याच्या वतीने त्यांचे विशेष आभार मानण्यात आले. “प्रशासनात डॉ. कारेकर यांच्यासारखे संवेदनशील अधिकारी असल्यामुळेच सामान्य शिक्षकाला वेळेत न्याय मिळतो, “अशा भावना संगमेश्वर विद्यालयातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *