शिक्षक परिषदेच्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण

| मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागातर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण नुकतेच करण्यात आले. महिला शिक्षकांसाठी ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

निबंध स्पर्धेच्या पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम पायोनिअर हायस्कूल अॅण्ड ज्युनियर कॉलेज, माटुंगा येथे आयोजित केला होता. मराठी निबंधासाठी स्पृहा सुरेश इंदू, विभा द्विवेदी यांना हिंदी, तर शिप्रा दुबे यांना इंग्रजी निबंधासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी अॅड. तृप्ती पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मुंबई विभागाचे अध्यक्ष सुहास हिर्लेकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, कोषाध्यक्ष गणेश नाकती, कार्याध्यक्ष आनंद शर्मा यांच्यासह विशाल कढणे, महिला आघाडीच्या प्रमुख वैशाली नाडकर्णी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *