*सांगली,प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनेची सहविचार सभा घ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मागणी, सांगली……. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे* *विभागाची मीटिंग न्यू इंग्लिश स्कूल, पुणे या ठिकाणी झाली. सदर मिटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे सोमवार दि.१३ एप्रिल २०२६ रोजी एकाच दिवशी पुणे विभागातल्या सर्व जिल्हे आणि सर्व महानगरच्या शिक्षण प्रमुखांना निवेदन देण्याचे ठरले* *त्यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये शिक्षणाधिकारी जि. प सांगली यांना निवेदन देण्यात आले . सदर शिष्टमंडळाचे नेतृत्व पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी शिक्षक आमदार मा. भगवानराव साळुंखे आप्पा यांनी केले. निवेदनामध्ये संघटनेची सविचार सभा घ्या, आपल्या कार्यालयात प्रलंबित असलेल्या सर्व प्रकरणांचा निपटारा करा, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले. शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करा यासंदर्भात* *जिल्हाधिकारीसो सांगली, यांनाही निवेदन देण्यात आले. वेतन पथक अधीक्षक लावंड साहेब यांची भेट घेऊन प्रलंबित प्रश्नांबाबत*
*निवेदन देण्यात आले* *शिष्टमंडळामध्ये पुणे विभागाचे कार्यवाह डॉ. बाळासाहेब चोपडे सांगली जिल्हाध्यक्ष, संजय पाटील, जिल्हा कार्यवाह रमेश कोष्टी, प्रांत सदस्य बजरंग शिंदे, महानगर संघटन मंत्री बाळासाहेब कणके, ए बी आर एस एम च्या सदस्य डॉ. सुजाता कुलकर्णी व पदाधिकारी उपस्थित होते*
🔰🔰🖋️🖋️🔹🔹🔸🔸
