मराठी माध्यमाच्या शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, देश वाचवा या अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष मा आ श्री भगवानराव साळुंखे आप्पा यांच्या नेतृत्वात आज सकाळी दहा वाजता जनसमर्थन अभियान सुरु करण्यात आले त्यावेळी रथयात्रेचा प्रारंभ सत्यशोधक शिक्षण मंडळ, करंजवडे ता. वाळवा चे अध्यक्ष व करंजवडे हायस्कूल चे मा मुख्याध्यापक श्री सुधीर जंगम सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला ,त्यावेळी सदगुरू जंगली महाराज शिक्षण संस्था, कापूसखेड चे सचिव श्री सत्यजीत जाधव , सदगुरू आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर, शिक्षक परिषदेचे राज्याचे कोषाध्यक्ष श्री राजेंद्र सूर्यवंशी सर, शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे उपाध्यक्ष श्री विजयकुमार माने सर,भाजप चे प्रांत सदस्य श्री राजू जाधव, भाजप चे कार्यकर्ते श्री बाबर साहेब, श्री जयसिंग उथळे, श्री अजित पाटील व अन्य शिक्षक,शिक्षकेतर प्रतिनिधी उपस्थित होते