शिक्षकांच्या प्रश्नांसाठी शिक्षक परिषद सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकार कुठलेही असो, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सदैव शिक्षकांच्या प्रश्नांना घेऊन सरकारशी दोन हात करायला तयार आहे, असे मत माजी आमदार नागो गाणार यांनी परिषदेच्या जिल्हा अधिवेशनाच्या उद्घाटनाप्रसंगी व्यक्त केले.
परिषदेचे जिल्हा अधिवेशन कन्हान येथे पार पडले. राज्यमंत्री ॲड. आशिष जैस्वाल यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन झाले. याप्रसंगी मीनानाथ सातपुते, राजू शेंद्रे, पूजा चौधरी, शरद डोणेकर, नगराध्यक्ष राजेंद्र शेंद्रे, उपाध्यक्ष रिंकेश चवरे, अजय वानखेडे, सुभाष
गोतमारे, मनीषा कोलारकर, मधुकर मुप्पीडवार, रामदास गिरटकर, राजेंद्र पटले, सुधीर वारकर, प्रमोद बोढे, सुनील शेळके, डिंपी बजाज, सुनंदा दिवटे, विनायक इंगळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक राजीव तांदूळकर, संचालन भाग्यश्री नखाते यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *