महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग वार्षिक नियोजन बैठक दिनांक एक व दोन ऑगस्ट 2026 रोजी वाघेरे हायस्कूल सासवड येथे पार पडली या बैठकीत शिक्षक सभासद नोंदणी करावी, संघटना पदाधिकारी यांनी आपल्या विभाग जिल्हास्तरावर शाळांच्या मध्ये भेटी देऊन प्रश्न समजावून घेऊन त्याची विभागणी करावी व जिल्हा शिक्षण अधिकारी उपसंचालक शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त व शिक्षण सचिव या स्तरावरील प्रश्न संबंधित पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोच करावे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आंदोलन करणे व मोठ्या प्रमाणात सहभागी होणे त्याचबरोबर संघटना सुविचार आयोजित करणे व प्रश्न मार्गी लावणे असे महत्त्वाचे ठराव करण्यात आले जुनी पेन्शन योजना मिळावी संस्था अनुदानित शाळांना शंभर टक्के व पुढील टप्पा हा नैसर्गिक न्यायतत्त्वाने मिळावा दहा वीस तीस योजना राबवावी, एप्रिल 2013 पूर्वी निमित्त शिक्षकांना टीईटी सक्तीतून मुक्तता द्यावी इत्यादी ठराव करण्यात आले.
नोव्हेंबर 2026 रोजी होणाऱ्या पुणे विभाग शिक्षक मतदार संघामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे या उमेदवाराच्या पाठीशी सर्वांनी एकजुटीने उभा राहण्याचे सर्वानी ठरवले. सदर वार्षिक नियोजन बैठकीसाठी राज्य अध्यक्ष विनोद कडून सहकार्य राजकुमार बोल केले राज्यपरचे अध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी राज्य संघटन मंत्री किरण भाऊ ठाणेकर राज्य कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार भगवंता साळुंखे पुणे विभाग अध्यक्ष राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळी पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड कार्यवाह बाळासाहेब चोपडे विभाग कोषाध्यक्ष महेश शेलार, महिला आघाडी प्रमुख अंजली गोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक कुलकर्णी, बी जी शिंदे, संजय सातपुते तसेच जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष व कार्य कोषाध्यक्ष कार्यकारणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
