*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडून विद्यार्थ्यांना रायटिंग पॅडचे वाटप*

जुन्नर: (आमच्या प्रतिनिधीकडून)

शिक्षण क्षेत्रात आयुष्यभर निष्ठेने कार्य करणाऱ्या शिक्षकांचा वारसा पुढे नेण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जुन्नर तालुक्याच्या वतीने एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. शिक्षक परिषदेचे मार्गदर्शक स्व. ईश्वरचंद्र पोखरकर सर व स्व. भास्करराव पानसरे सर यांच्या पवित्र स्मृती प्रित्यर्थ तालुक्यातील गरजवंत विद्यार्थ्यांना ‘रायटिंग पॅड’चे (लेखन पाटी) वाटप महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष श्री.निलेश काशिद व जुन्नर तालुका अध्यक्ष श्री.बाळासाहेब लामखडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

जुन्नर तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल धामनखेल, श्री कुलस्वामी विद्यालय वडज, श्री समर्थ मधुकरराव विद्यालय चिंचोली काशीद,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तांबे,न्यू इंग्लिश स्कूल आंबोली, शिवांजली विद्यानिकेतन चाळकवाडी, ज्ञानदा विद्या मंदिर नारायणगाव, शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर, न्यू इंग्लिश स्कूल निमगिरी,अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कोळवाडी याबरोबर तालुक्यातील इतर गरजवंत विद्यार्थ्यांनाही रायटिंग पॅडचे वाटप करण्यात आले.या उपक्रमात मुख्याध्यापक कुटे सर, निमसे सर, कांबळे मॅडम, नांगरे सर, वाघ सर, उकिर्डे सर,चासकर सर , येवले मॅडम,लांडे सर, प्राचार्य गायकर सर व तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी यांनी सहभाग घेतला. तालुक्यातील विविध शैक्षणिक व सामाजिक स्तरातून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे स्वर्गीय पोखरकर सर व स्वर्गीय पानसरे सर यांच्या स्मृतींना यावेळी उपस्थितांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली.

यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद म्हणाले, “पोखरकर सर आणि पानसरे सर यांनी आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षकांच्या न्याय्य हक्कासाठी लढा दिला. त्यांच्या विचारांची शिदोरी आणि आठवण कायम ठेवण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात किंवा अभ्यासासाठी या रायटिंग पॅडचा निश्चितच उपयोग होईल.”

या कार्यक्रमाचे नियोजन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जुन्नर तालुका अध्यक्ष बाळासाहेब लामखडे, कार्यवाह प्रणव काळे, कोषाध्यक्ष दीपक पाटील, पुणे जिल्हा कार्यालय मंत्री कैलास कर्पे, तालुका उपाध्यक्ष श्री. कैलास शिंदे,श्री.अभिजित भुजबळ, श्री.रमाकांत फापाळे,श्री.प्रशांत बहिर, श्री.अविनाश शेटे,प्रा.शरद मनसुख,श्री.अशोक पाटील,श्री.भाऊ वेडे, श्री.लक्ष्मण डुंबरे,श्री.ज्ञानेश्वर सस्ते,श्री.शरद ताटे,श्री.महादेव डिसले,श्री.ज्ञानेश्वर वाघ,श्री.संजय लांडे,श्री.ज्ञानेश्वर नायकोडी,श्री.विजय चव्हाण,श्री.संदीप शेलार,श्री.काशिनाथ वाकचौरे, श्री.रमेश जाधव,श्री.व्यंकट मुंडे, श्री. प्रशांत थोरात, श्री. संजय उंडे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *