*पुणे माध्यमिक शिक्षण विभागात झिरो पेंडन्सीसह गुणवत्ता वाढविण्यावर भर: डॉ.भाऊसाहेब कारेकर*

*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण व शहर सहविचार सभा संपन्न*

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण व शहर यांची माध्यमिक शिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद,पुणे यांच्याशी त्रैमासिक सहविचार सभा संपन्न झाली.

यावेळी पुणे जिल्ह्यातील अनेक शिक्षक–शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संबंधित कामांबाबत पाठपुरावा करण्यात आला.दरमहा वेतन एक तारखेला होणे,सेवापुस्तक दुय्यम प्रत कर्मचार्‍याला मिळणे,सेवाज्येष्ठता यादीची सत्यप्रत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मिळावी,सेवा हमी कायद्याचे पालन, प्रस्तावाचे अवलोकन करून त्यामध्ये त्रुटी असल्यास एकदाच काढण्यात याव्यात वैद्यकीय बिले,निवड श्रेणी मान्यता,सर्व प्रकारच्या वैयक्तिक मान्यता विना विलंब मिळणे,सेवानिवृत्त कर्मचारी यांचा प्रस्ताव निपटारा व त्यांचे फायनल पेमेंट विनाविलंब मिळावा, 2021–22 ते 2025–26 या कालावधीतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पीएफ पावत्या मिळाव्या, एनपीएस धारक कर्मचाऱ्यांच्या हिशोब मिळावा,23 शिक्षकांची वैयक्तिक प्रलंबित प्रस्ताव याबाबत पाठपुरावा करण्यात आला. वरील सर्व कामांचा आढावा घेऊन 31 ऑगस्ट पर्यंत पीएफ पावत्यांसह इतर सर्व कामे मार्गी लावण्याचे आश्वासन

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी दिले.पुणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी विविध कार्यक्रम आयोजित करावे, पुणे जिल्ह्यातील निवडक शाळांची तपासणी करावी, माध्यमिक शाळातील शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचाही गुणगौरव व्हावा यासाठी गुणगौरव शिक्षक परिषद सहकार्य करेल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष निलेश काशिद यांनी दिले.

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी पुणे माध्यमिक शिक्षण विभागात केलेल्या प्रशंसनीय बदलाबाबत तसेच गुणवत्ता संवर्धन अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबवून संपूर्ण महाराष्ट्राला दिशादर्शक उपक्रम दिल्याबद्दल शिक्षक परिषदेचे विभाग कोषाध्यक्ष महेश शेलार व जिल्हा कार्यवाह शिवहार लहाने यांनी साहेबांचे अभिनंदन करण्यात आले.

या सहविचार सभेसाठी पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार भगवानराव साळुंखे, डेक्कन एज्युकेशनचे संचालक अमित कुलकर्णी,राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे,संजय सातपुते,महेश शेलार, संजीव मांढरे,अंजली गोरे,रामदास अभंग,पुणे जिल्हाध्यक्ष निलेश काशिद,कार्यवाह शिवहार लहाने,कोषाध्यक्ष भाऊसाहेब खोसे,उपाध्यक्ष अरविंद गवळे, अशोक कराड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुभाष देवकाते, सुभाष मोरे, पुणे शहराध्यक्ष विष्णू मोरे तसेच तालुकाध्यक्ष बाळासाहेब लामखडे,विजय साळवे,लतीफ शेख,राम कदमबांडे, अरुण खेडकर, विजय पिलाने, विकास घुले,देवराम पारिठे , ज्ञानेश्वर सस्ते, प्रशांत बेंगळे व परिषदेचे बहुसंख्या पदाधिकारी तसेच अधीक्षक मंगेश कदम साहेब उपस्थित होते.

ही सहविचार सभा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. जिल्हा कोषाध्यक्ष भाऊसाहेब खोसे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *