महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुजनांचा सत्कार
सांगली : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभागाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून पलूस, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्यातील विविध शाळांना भेट देत शिक्षकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या उपक्रमामध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे पुणे विभागाचे कार्यवाह डॉ. बाळासाहेब चोपडे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कुंभार सर ,उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील सर, परिषदेचे कवठेमहाकाळ तालुक्याचे अध्यक्ष सचिन पाटील सर सहभागी होते. शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना शैक्षणिक साहित्याची भेटवस्तू व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे पंचपरिवर्तन पत्रकाची प्रत देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांनी समाज घडविण्यासाठी केलेले योगदान आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले मोलाचे योगदान याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगताना, शिक्षक हा समाजाचा खरा शिल्पकार असून त्याच्या कार्याचा सन्मान करणे ही समाजाची जबाबदारी असल्याचे मत व्यक्त केले.
या अभिनव उपक्रमाचे शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी मनापासून स्वागत केले. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, पुणे विभागाच्या या उपक्रमामुळे गुरुजनांप्रती आदरभाव अधिक दृढ झाला
.