*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा भंडारा ची जिल्हा बैठक नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा येथे संपन्न झाली. सभेमध्ये “नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ मतदार नोंदणी अभियान” यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी विभाग अध्यक्ष सन्माननीय अजय जी वानखेडे आणि विभाग कार्यवाह सन्माननीय सुभाष जी गोतमारे यांनी मार्गदर्शन केले. ज्यांची अजूनही नोंदणी झालेली नाही अशांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आव्हान सर्व शिक्षक बंधूंना करण्यात आले.*
*याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री अंगेश जी बेहलपाडे आणि तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.* 