*प्रत्येक हुशार विद्यार्थ्यांचे उद्दिष्ट शिक्षक बनणे व्हावे अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी मा. नितीनजी गडकरी*
*महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आयोजित शिक्षकांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या थाटात आज संपन्न झाला.*
*कार्यक्रमाचे उद्घाटक केंद्रीय मंत्री मा. नितिन गडकरी* मार्गदर्शन करताना म्हणाले एखादा वकील डॉक्टर किंवा इंजिनियर चुकला तर चालेल परंतु शिक्षकाची चूक पिढी बरबाद करते. शिक्षकाची कर्तव्य व अधिकार याबाबत विचार करताना शिक्षणाचाही विचार करावा. केवळ बुद्धिजीवी असणे गरजेचे नसून सुसंस्कृत असणे गरजेचे आहे विचार आणि भावार्थ यातून संस्कार निर्माण होते आणि असा सुसंस्कृत व्यक्ती सुसंस्कृत समाज व देश घडवितो.
*प्रमुख वक्ता हर्षल चौधरी* विद्यार्थ्यांना उद्बोधन करताना म्हणाले स्वचिंतनाने आपले जीवन बदलल्या जाऊ शकते पैशासाठी जगायचे नसले तरी पैशाचे नियोजन शिकावे योग्य संस्कार व संगत यश टिकवण्यासाठी आवश्यक असते.
*प्रमुख अतिथी, माजी आमदार अनिल सोले* आपल्या भावना व्यक्त करताना म्हणालेत कर्तव्यप्राप्तीची आसक्ती असावी सतत सराव व मेहनत केल्यानेच यश टिकवने शक्य आहे.
*माजी शिक्षक आमदार माननीय नागो गाणार* म्हणालेत आपले पालक शिक्षक आहे याचे भान विसरू नका शिक्षकावर दिलेली जबाबदारी त्यांच्या पाल्यांनाही जोपासायची आहे. जीवनात शिस्त सोडू नका. संघर्षातही शिस्त सोडू नये शिस्त सोडल्यास माणुसकी सुटते. ध्येयप्राप्तीपर्यंत कार्य करा जेष्ठांचा गुरूंचा सन्मान करा. समाजाच्या कल्याणाकरिता स्वतःला घडवा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
*राज्य महिला आघाडी प्रमुख सौ पूजा चौधरी* गुणगौरव सोहळा म्हणजे पारिवारिक कौतुक सोहळा होय. मराठी माध्यमांच्या शाळांची दुरावस्था झाली आहे. मराठी माध्यमाच्या शाळेतूनच राष्ट्र प्रेमाचे धडे दिले जाऊ शकतात. मराठी शाळा वाचवण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
*कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री राजेंद्र पटले* यांनी उपस्थित पालकांचे अभिनंदन व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन कौतुक केले.
*याप्रसंगी प्रमुख वक्ता माननीय श्री हर्षल चौधरी (लेखक ) सीनियर सॉफ्टवेअर आर्किटेक यांच्या ” Be the architect of your life ” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.*
*नागपूर शहर कार्यवाह प्रमोद बोढे* यांनी प्रास्ताविक व थोडक्यात अहवाल सादर केला.
*विभाग महिला आघाडी प्रमुख डॉक्टर मनीषा कोलारकर* यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
*संयोजक श्री रुपेश रेवतकर* यांनी उपस्थितांचे आभार मानले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नागपूर विभाग, नागपूर ग्रामीण, नागपूर शहर, व नागपूर प्राथमिक चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
नागपूर शहर कार्यवाह
प्रमोद बोढे.
