‘टीईटी’च्या निकालामुळे शिक्षकांमध्ये संभ्रमावस्था
शिक्षक परिषदेतर्फे अनुकूल निर्णय घेण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर: सर्वोच्च न्यायालयाने टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांविषयी दिलेल्या निर्णयात राज्य शासनाने हस्तक्षेप करून शिक्षकांमध्ये असलेली संभ्रमावस्था दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे विभागीय आयुक्त,जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने कार्यरत असलेल्या आणि टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांविषयी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. त्यात टीईटी लागू होण्याच्या आधीपासून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे हजारो शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे शिक्षक परिषदेतर्फे राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले की, राज्य शासनाने १३ फेब्रुवारी २०१३ पासून टीईटीच्या संदर्भात धोरणात्मक निर्णय घेऊन शासन परिपत्रक जारी करून टीईटी लागू केली आहे.सद्य:स्थितीतही सुरू आहेत. त्यामुळेसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाने २०१३ च्या धोरणात्मक निर्णयाशी सुसंगत निर्णय घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा संघटना राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. संघटनेचे राज्य कार्याध्यक्षगणेश पवार, सुरेश पठाडे, अनिल घायवट, नितीन पवार, दिलीप कुंदे,काकासाहेब जाधव, विजय फरकाडे,अतुल घडमोडे, मनोज वाघ, अशोक पवार, शामकांत पाचपुते, प्रशांत मेरत,परमेश्वर गायकवाड आदींची उपस्थिती होती.
