बुधवार दिनांक 19/08/2026
प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी सहविचार सभा घ्या…. शिक्षक परिषदेची मागणी. सांगली….. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभागाच्या वतीने विविध प्रलंबित कामाचा निपटारा करण्यासाठी संघटनेची सविचार सभा घ्या अशा आशयाचे निवेदन सांगली जि. प. (माध्यमिक) चे शिक्षणाधिकारी मा. राजसाहेब लोंढे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले. सदर शिष्ट मंडळामध्ये पुणे विभागाचे कार्यवाह डॉ. बाळासाहेब चोपडे, सांगली जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर कुंभार, प्रांत सदस्य बजरंग शिंदे, जिल्हा सदस्य आनंदराव सावंत, सुनील रावळ व पदाधिकारी उपस्थित.