शिक्षक परिषदेचे शत प्रतीक्षत मतदान अभियान

दै. लोकजन वृत्तसेवा
भंडारा :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा जिल्ह्याच्या वतीने येत्या लोकसभा निवडणुकीत शत प्रतिशत मतदान व्हावे व मतदानाच्या बद्दल राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जाणीव आणि जागृती निर्माण व्हावी मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता मतदान शत प्रतिशत होणे आवश्यक आहे.

अनेक गावांमध्ये आणि शहरात देखील मतदानाच्या दिवशी बाहेर फिरायला जाऊन मतदान न करण्याची प्रवृत्ती बळावत आहे. कोणते ना कोणते कारण सांगून मतदानाला न जाणे असेही सध्या दिसून येत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा जिल्ह्यातील के जी टू पी जी शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन मतदानाच्या संदर्भात जागृती निर्माण करीत आहे.

या अभियानात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अंगेश बेहलपाडे, जिल्हा कार्यवाह सुभाष गरपडे, पुंडलिक नाकाडे, अशोक वैद्य, अविनाश पाठक, राधेश्याम धोटे स्नेहल खानापूरकर के. डी. बोपचे श्रीकांत हरडे, सचिन तिरपुडे, मनीषा काशिवार, पांडुरंग टेंभरे, राजेश निंबार्ते, पराग टेंभेकर, वंदना पोहाणे, सेवकराम कुथे, पांडुरंग दराडे, पुरुषोत्तम डोंमळे, प्रा. पितांबर उरकुडे, प्रा. सहसरामजी बनसोड, सुनील सावरकर, नंदू करंजेकर, प्रकाश मस्के, अशोक रंगारी, विजू करंडे, दिलीप वाणी, प्रदीप गोमासे, प्रयान भाजीपाले, महादेव सोनवाणे, लोकानंद नवखरे, यादव गायकवाड, अक्षय मासुरकर, राजू बारई, महादेव तेलमासरे, आशिष मुधोळकर, अमित ढगे, नीलकंठ कापगते, सुभाष चवडे, प्रवीण राऊत, शैलेश प्रधान इत्यादी जिल्हा कार्यकारणी व तालुका पदाधिकारी सहभागी झालेले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *