मराशिपतर्फे मतदार जनजागृती अभियान
अहेरी – महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे मतदार जनजागृती अभियान अहेरी व भामरागड तालुक्यात राबविण्यात आले. त्या अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचे विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार आणि पदाधिकारी यांनी मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत दिनांक २९ मार्च २०२४ ला गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी व भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे जाऊन जेष्ठ समाजसुधारक प्रकाश आमटे, त्यांच्या पत्नी मंदाताई आमटे आणि लोक बिरादरी हायस्कूल हेमलकसा येथे भेट देऊन विद्यार्थी व मतदारांमध्ये निवडणुकी संदर्भात जनजागृती केली. याप्रसंगी जिल्हा संघटन मंत्री दिलीप तायडे, बाळबुद्धे, देशमुख, नैताम, कुलकर्णी आणि कापगते उपस्थित होते.
