विद्यापीठात भगतसिंह शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम
भिखाभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती
सोलापूर :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आज भगतसिंह यांच्या शहीद दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा महाराष्ट्राचे प्रभारी भिखाभाई पटेल उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, शिक्षक महासंघाचे राज्य संघटनमंत्री कृष्णा हिरेमठ, शिक्षक परिषदेचे कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, प्रा देवानंद चिलवंत, शिक्षक महासंघाचे जिल्हा सचिव विश्वजीत माणिकशेट्टी, प्राचार्य इजा तांबोळी, शिक्षक परिषदेचे सोमनाथ राठोड, आदी मान्यवर उपस्थित होते. या श्रद्धांजली कार्यक्रमात प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात भगत सिंह यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित सर्वांना कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी भिखाभाई पटेल व कृष्णा हिरेमठ यांचा सत्कार कुलगुरू प्रकाश महानवर व प्र कुलगुरू लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते करण्यात आला. कुलगुरूंनी शैक्षिक महासंघाच्या उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याची प्रशंसा केली तसेच शैक्षिक महासंघ आणि सोलापूर विद्यापीठाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
