शाळा वाचवा शिक्षण वाचवा आंदोलनात सक्रिय सहभाग घ्यावा — राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू
शाळा वाचवा शिक्षण वाचवा सह टीईटी परीक्षा सक्ती बाबतच्या न निर्णयाबाबत केंद्र सरकारने रिव्ह्यू एप्लीकेशन सादर करावे. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त परंतु त्यानंतर 100% अनुदानित शाळा व तुकडी वरील शिक्षक शिक्षकेतरांना सेवानिवृत्तीनंतरही जुन्या पेन्शनचा लाभ मिळालेला नाही. तो त्वरित द्यावा. MEPS ऍक्ट मधील नियम 19 व 20 नुसार शिक्षण विभागातील सर्वांनाच जुनी पेन्शन योजना लागू करावी.10 20 30 योजना योजनेचा लाभ देण्यात यावा. यासह MEPS ऍक्ट 1981 मधील तरतुदीनुसार शाळा तेथे मुख्याध्यापक पद देऊन पटसंख्या वाढ होण्याकरता शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा.घटत्या पटसंख्येचा विचार करून विद्यार्थी शिक्षक प्रमाण जाचक अट शिथिल करावी व सामान्य नागरिकांच्या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाडीकरता आवश्यक व पुरेशा प्रमाणात वेळेत शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. थकित बिले वेळेत जमा करुन शिक्षक कर्मचारी यांना दिलासा द्यावा, शैक्षणिक भ्रष्टाचार दूर करण्यासाठी उपाय योजना करावी. यासह अन्य ज्वलंत समस्या बाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या दोन दिवशीस राज कार्यकारणी मध्ये ठराव करण्यात आल्याची माहिती राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी दिली.घटत्या विध्यार्थी पटा अभावी शिक्षक अतिरिक्त होऊन त्याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होतो.यासाठी शिक्षण वाचवा आंदोलनात संस्थाचालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांनी सक्रिय सामील व्हावे असे आवाहन माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी केले हि राज्य कार्यकारिणी दिनांक 28 फेब्रुवारी व एक मार्च 2026 रोजी शिवाजी विद्यापीठ येथे आयोजित करण्यात आली होती. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ संलग महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या या राज्य कार्यकारिणीच्या दरम्यान दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी पाच वाजता शिक्षक कार्यकर्ता मेळावाही आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यास शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र- कुलगुरू ज्योती जाधव यांनी मार्गदर्शन केले वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक,माध्यमिक व प्राथमिक शिक्षक बांधव ABRSM अंतर्गत एका छताखाली आल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केलेच त्याचबरोबर शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संघटना प्रयत्न करत आहेत याबाबत समाधानही व्यक्त केले. ABRSM महाराष्ट्र प्रांताचे अध्यक्ष प्रदीप जी खेडकर यांनी हे संघटन राष्ट्र के हीत मे शिक्षा,शिक्षा के हीत मे शिक्षक व शिक्षक के हितमे समाज या त्रिसूत्रीवर संघटना कार्यरत असल्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे अध्यक्ष मुकुंदराव भावे यांनी भावी पिढी सक्षम होण्यासाठी व भारत बलशाली व्हावा यासाठी पंच परिवर्तनाचे मुद्दे सांगितले व त्यांचे अनुकरण करण्यासंबंधी मार्गदर्शन केले कार्यक्रमाची प्रास्ताविक राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले तर सूत्रसंचालन संघटन मंत्री किरण भावठणकर यांनी केले कार्यकर्ता मेळाव्यास ABRSM विभाग अध्यक्ष एन बी गायकवाड, राहुल माने, शरद बनसोडे, शिक्षक परिषदेचे राज्य पदाधिकारी सह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
राज्यकार्यकारीणी बैठकीस सरकार्यवाह राजकुमार बोनकीले , सुनील पंडित, नरेंद्र वातकर,गुलाबराव गवळे,उमाकांत कुलकर्णी,गणेश पवार, बी जी शिंदे,विनायक कुलकर्णी,सुरेश राठोड,बाळकृष्ण चोपडे, सोमनाथ राठोड,राजेंद्र नागरगोजे अमित कुलकर्णी ,अजय वानखेडे,संतोष सुरावर,विनोद पांढरे,मधुकर मुपीडवार,राजेंद्र चोथवे,अमोल काटेकर, शंकरराव पुंड,सुरेश पठाडे, शिवाजी सागडे, शरद दळवी, लक्ष्मण वालुगडे, प्रकाश पाटील, रामदास गिरटकर,सुधीर वारकर लदाफ सर, संदीप काळे इत्यादी उपस्थित होते.
