अखेर ‘त्या’ शिक्षकाला मिळाला न्याय

चामोर्शी, १३ फेब्रुवारी

राजे धर्मराव उच्च प्राथमिक शाळा घोट ही शाळा ८ वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. त्यामुळे तेथे कार्यरत शिक्षक एस. आर. झाडे यांच्यावर उपासमारीची पाळी आली होती.

शिक्षक परिषदेचे माजी शिक्षक आमदार नागो गाणार व विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांच्या पाठपुराव्याने शिक्षक झाडे यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करण्यात आल्याने त्यांना मोठा दिलासा मिळाला. या संपूर्ण प्रक्रियेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागाचे कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी सहकार्य केले. दरम्यान, २७ मार्च २०१४ रोजी झाडे यांचे जि. प. उच्च प्राथमिक शाळा पेटतळा येथे समायोजन करण्यात आले. या समायोजनासाठीही सुरावार यांनी विशेष सहकार्य केले. झाडे ३१ मे २०२५ रोजी जि. प. उच्च प्राथमिक शाळा पेटतळा येथून सेवानिवृत्त झाले. या प्रकरणात नागपूर येथील अॅड. प्रदीप क्षीरसागर यांनी झाडे यांना अवघ्या ७ महिन्यांत न्याय मिळवून दिला. तसेच शिक्षणाधिकारी पवार आणि उपशिक्षणाधिकारी नाकाडे यांनीही प्रकरण तातडीने निकाली निघण्यासाठी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *