‘राज्य शिक्षण परिषद’ च्या यश
सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट
कल्याण : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा सीईटी देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना ‘राज्य निवडणूक आयोग’ने दिले आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात ३ दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आल्यावर १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्याचवेळी राज्यातील सीटीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित
जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत. सीएटी परीक्षा आणि निवडणुकीचे काम एकाच वेळी गोंधळ पाहता ‘महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद’चे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सर्वत्र पत्रव्यवहार करत गोंधळातून मार्ग काढण्याचे निवेदन दिले. ‘भाजपा’चे प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाठपुराव्याला चव्हाण यांनी तातडीने ‘परिषद’च्या पत्राची दखल घेत पाठपुरावा केला आणि सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट मिळवली. ‘परिषद’चे कोकण विभाग अध्यक्ष गुलाबराव पाटील, कार्यवाह लक्ष्मण वालगुडे आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांचे आभार मानले.
