लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे जि.प. शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले. निवेदनात म्हटले की, ३१ ऑक्टोबर २००५ रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करून राज्यातील शिक्षक कर्मचाऱ्यांना पूर्ववत जुनी पेन्शन योजना लागू करावी. राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांना सेवाशर्ती नियमावली १९८१ मधील नियम क्रमांक १९ नुसार देय असलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी. निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कोषाध्यक्ष संतोष सुरावार, गडचिरोली जिल्हाध्यक्ष अनिल नुतीलकंठावार, कोषाध्यक्ष जीवन उईके, विश्वजित लोणारे, सागर आडे, मृणाली तुम्पल्लीवार, संतोष जोशी, इम्रान पठाण, दिलीप तायडे, गुरुदेव चाफले,अतुल सुरजागडे, पंकज भोगेवार, एकनाथ पेंदाम उपस्थित होते.
