लाखनी येथे शिक्षक परिषदेचे जिल्हा अधिवेशन

दै. लोकजन वृत्तसेवा

लाखनी :- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अधिवेशन ८ फेब्रुवारी रोजी स्वागत सेलिब्रेशन मंगल कार्यालय लाखनी येथे सकाळी ८.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. अधिवेशनाचे उद्घाटन  आमदार डॉ. परिणय फुके यांचे हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष अंगेश बेहलपांडे राहणार आहेत. मुख्य अतिथी म्हणून माजी खासदार सुनील मेंढे, स्वागताध्यक्ष म्हणून मुरमाडीचे सरपंच शेषराव वंजारी, मार्गदर्शक म्हणून माजी शिक्षक आमदार नागो गाणार, प्रमुख अतिथी शिक्षणाधिकारी (माध्य) मनीषा गजभिये,  शिक्षणाधिकारी गटशिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, नागपूर विभाग अध्यक्ष अजय वानखेडे, नागपूर विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे, नागपूर विभाग कार्याध्यक्ष अशोक वैद्य आणि नागपूर विभाग सहकार्यवाह पुंडलिक नाकाडे यांचे उपस्थितीत पार पडणार आहे.

सकाळी ८.३० वाजता नोंदणी, सकाळी १०.०० वाजता तक्रार निवारण तसेच सर्वोच्च न्यायालयाचा टीईटी संदर्भात निकाल व त्यावर संघटनेची भूमिका आणि शिक्षकांची सेवाजेष्ठता यावर शंका विभाग कार्यवाह सुभाष गोतमारे, उपाध्यक्ष विनोद पांढरे आणि जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत हरडे यांच्या उपस्थितीत (प्राथ.) रवींद्र सोनटक्के, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनामध्ये मान्यतेचा १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय रद्द करणे, जुनी पेन्शन योजना पूर्वीप्रमाणेच लागू करणे, वेतन अनुदानावर आधारित वेतनेतर अनुदान देणे, शैक्षणिक कामाचा बोजा कमी करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन देणे, महिला व बालसंगोपण रजा दोन वर्ष करणे, मुख्याध्यापक व शिक्षक यांना सरसकट आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देणे. अशा प्रमुख मागण्या करण्यात येणार आहेत. अधिवेशनाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शिक्षकांनी उपस्थित राहून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अंगेश बेहलपांडे आणि जिल्हा कार्यवाह राजेश निंबार्ते यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *