महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी
विविध विषयांवर आज दिनांक २५ डिसेंबर रोजी तालुका अध्यक्ष संदीपजी गोरीवले सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सदर सभेत जिल्हा रत्नागिरी मेळावा, टीईटी परीक्षा,१५ मार्च संचमान्यता, टप्पा अनुदान,जुनी पेन्शन योजना इत्यादी विषयांवर चर्चा करण्यात आली.या सभेमध्ये जिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, जिल्हा सल्लागार मधूकर मोरे, माजी तालुकाध्यक्ष तुकाराम गरंडे, माजी तालुकाध्यक्ष सुनिलकुमार गोरीवले, कोकण विभाग सहकार्यवाह सुनिल गौड, जिल्हा संघटक दादा बिडगर, तालुका संघटक अभिनव खोत, तालुका उपाध्यक्ष हेमंत शिगवण, महिला संघटिका मंजीरी शितूत, जिल्हा प्रतिनिधी अमित वाखंडे, सल्लागार चंद्रकांत पांढरे, जेष्ठ सल्लागार, प्रशांत गुरव.इ बहुसंख्येने शिक्षक परिषदेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सभा संपन्न झाली व चर्चा मध्ये सर्वांनी सहभागी होऊन सर्व शाळा भेट करण्याचे नियोजन करण्यात आले.सर्वानी आपला बहुमूल्य वेळ देण्याचे मान्य केले या प्रसंगी गौड सरांनी सर्वांचे आवाहन प्रित्यर्थ आभार मानले.शेवटी आज पर्यंत व पुढेही दापोली शिक्षण संस्थेचे जे सहकार्य मिळते त्या बद्दल ही संस्था व संचालक मंडळांचे ऋण व्यक्त करून सभा केळी वाटप आणि चहा नाश्ता नंतर आनंदी वातावरणात पार पडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *