राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कार्यकारिणीची सभा संपन्न.
वर्धा : रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 ला महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग कार्यकारिणीची सभा नागपूर येथे संपन्न झाली सभेचे अध्यक्ष विभागीय अध्यक्ष सन्मा. श्री. अजयजी वानखेडे सर राज्याचे कार्याध्यक्ष तथा माजी विधान परिषद सदस्य, माजी आमदार मान. श्री नागो गाणार सर तसेच सहाही जिल्ह्यातील अध्यक्ष कार्यवाहक कोषाध्यक्ष संघटन मंत्री महिला आघाडी प्रमुख यांच्या उपस्थितीत सभेचे कामकाज पूर्ण करण्यात
आले. सभेमध्ये अनेक ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. मागील सभा दिनांक 27.09.2025 ला आजचे इतिवृत्त वाचून वाचन करून कायम करण्यात आलेत विभाग कार्यवाह सन्मा. श्री. सुभाष गोतमारे सर यांनी केले संघटनेचा जमाखर्च अहवाल विभाग कोषाध्यक्ष सन्मा.श्री.संतोष सुरावर सर यांनी सभेपुढे मांडला माननीय माजी आमदार श्री. नागो गाणार सर यांनी सभेला संबोधित केले. भोजना नंतर सभा समाप्त झाली. सभेमध्ये खालील पदाधिकारी
उपस्थित होते विभागीय उपाध्यक्ष श्री. मधुकरजी मुपीडवार सर, श्री. विनोदजी पांढरे सर, श्री. सुधीर वाडकर सर,श्री.तुलाराम मेश्राम सर तसेच वर्धा जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर राठोड सर,जिल्हाकार्यवाह श्री. मारोती सयाम सर, कार्याध्यक्ष श्री. दीपकजी ढगे सर, संघटनमंत्री श्री. गोपाल सोनी सर, नागपूर विभाग सहकार्यवाहक सौ. मनीषा साळवे मॅडम नागपूर शहर कार्यवाह श्री. प्रमोद बोढे सर, उपाध्यक्ष श्री.सय्यद सलीम सर नागपूर ग्रामीण अध्यक्ष श्री. मीनानाथ सातपुते सर, कार्यवाह श्री. राजीव तांदूळकर सर, कोषाध्यक्ष श्री. चंद्रकांत चौधरी सर, चंद्रपूर जिल्हा कोषाध्यक्ष श्री. धनंजय बोरकर सर, गडचिरोली जिल्हाध्यक्ष श्री. अनिल नूतिलकंठावर सर, कोषाध्यक्ष श्री. सुनील कुमार तुमपल्लीवार सर, संघटन मंत्री श्री. सत्यजित लोणारे सर,महिला आघाडी प्रमुख मृणाली
तुमपल्ली वार मॅडम आदी जिल्हा व विभागीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
