राज्य शिक्षक परिषदेचे अधिवेशनासमोर आंदोलन आज
वाशीम :
शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी राजकुमार बोनकिले अधिवेशनासमोर यशवंत स्टेडियम येथे आज, १३ डिसेंबर रोजी धरणे आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात शिक्षक बांधवांनी बहुसंख्येने सहभागी होण्याचे आवाहन विभागीय सहकार्यवाह राजकुमार बोनकिले यांनी केले आहे. शिक्षकांच्या प्रमुख मागण्यामध्ये अशैक्षणिक शासन निर्णय १५ मार्च २०२४ रद्द करा, टिईट पात्रता परीक्षा अट रद्द करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व प्रकारच्या शाळांना देय वेतन अनुदानावर आधारित वेतनेत्तर अनुदान देण्यात यावे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये, शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करा, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कॅशलेस योजना लागू करा, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची भरती सुरु करा अशा मागण्या त्यांनी केल्या आहेत. शिवाय महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देय घोषित करा यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

या आंदोलनात राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, माजी आमदार नागो गाणार, भगवान साळुंखे, निरंजन गिरी, राजेंद्र सूर्यवंशी, किरण भावठाणकर, पूजा चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. शिक्षण क्षेत्रातील ज्वलंत प्रलंबित न्याय मागण्याच्या पूर्ततेसाठी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आयोजित धरणे आंदोलनात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन राजकुमार बोनकिले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *