शिक्षकांचे प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
गोंडपिपरी, ता. १५ जुनी पेन्शन योजना, अशैक्षणिक कामातून मुक्तता वैद्यकीय कॅशलेस सुविधा आदी २२ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने यशवंत स्टेडियममध्ये विधिमंडळ अधिवेशन काळात धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले. या आंदोलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

आंदोलनाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू, माजी विधानपरिषद आमदार नागो गाणार आणि माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी केले. यावेळी २२ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना सादर करण्यात आले. मुख्य मागण्यांमध्ये १५ मार्च २०२४ च्या अशैक्षणिक शासन निर्णयाची रहता, टीईटी पात्रता परीक्षा रद्द करणे, १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक- कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करणे, सर्व शाळांना वेतनेत्तर अनुदान देणे, विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढीव दराने देणे १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करणे, सर्व शिक्षक- कर्मचाऱ्यांना वैद्यकीय कॅशलेस योजना, चतुर्थश्रेणी पदे पुनरस्थापित करणे, महिला शिक्षकांना मासिक पाळी रजा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बालवाटिका स्तराला कायदेशीर दर्जा, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कार्यवाही आदींचा समावेश आहे. याशिवाय इंग्रजी माध्यमाच्या शाळांना एम.ई.पी.एस. १९८१ नुसार सेवा शर्ती लागू करणे, रात्रशाळांच्या मान्यता निकष पूर्ववत करणे, सरल व यू-डायसमध्ये वयाची शिथिलता, दरवर्षी नवीन टॅब उपलब्ध करणे, माध्यमिक शाळांत सेवक नेमणे, सेवा जेष्ठतेत एकवाक्यता आदी गिरी, अजय वानखेडे, सुभाष गोतमारे, मागण्याही करण्यात आल्या.

आंदोलनात राज्य कार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, संघटन मंत्री किरण भावठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजाताई चौधरी, कार्यालय मंत्री निरंजन Nagpur, Chandrapur-Today 16/12/2025 Page No. 3 संतोष सुरावर, रामदास गिरटकर, मधुकर मुप्पीडवार, विलास खोंड, विठ्ठल राजूरकर, धनंजय बोरकर, संध्या गिरडकर, गजानन शेळके, विवेक आंबेकर, पुंडलिक देठे, विनोद हलके, गणेश वाघमारे, सुनील पाचखेडे, झोडे, वाकडे, नाकाडे, मनीषा साळवे, रंजना कावळे, हेमंत बेलखोडे, प्रशांत वैद्य, अशोक वैद्य, गुणेश्वर कुंडे, ललिता हलमारे, रत्ना चौधरी, वनिता एलावार, शारदा श्रीरामे, तुलाराम मेश्राम, सोपान घुले, दीपक ढगे, सुरेश रोठे, सुभाष घोरपडे, घनश्याम मनबटूलवार, स्नेहल नागरे, मीनानाथ सातपुते, राजू तांदुरकर, चंद्रकांत चौधरी, मुकेश भांगे, भाग्यश्री नकाते, सतीश कचरे, अतुल टेकाडे, गुणवंत अवचितकर, वसंत हिवसे, ज्योती बोकडे, सुधीर राठोड, प्रदीप छलके, गोपाल सोनी, शुभांगी चिकटे, अंगेश बेहलपाडे, राजेश निंबरते, राधेश्याम धोटे, सेवकराम कुथे, स्नेहलता खानापूरकर, मधुकर चौधरी, मुरलीधर करंडे, उर्मिला रहांगडले, सुनील पाचखेडे, महेशकुमार तुमपल्लीवार, इम्रान पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *