मराशिप लढविणार शिक्षक मतदार संघ निवडणूक
विभागीय बैठकीत एकमुखाने निर्णय
• अमरावती, १५ डिसेंबर
अखिल भारतीय शैक्षिक महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, अमरावती विभागाची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी सकाळी ११ वाजता महिला महाविद्यालयात झाली. यावेळी पुढील वर्षी होणारी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. बैठकीचे आयोजन विभाग कार्यवाह डॉ. सुमित पवार यांनी केले होते.
बैठकीस अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात येऊन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद – २०२६ शिक्षक मतदार संघ अमरावती विभागाची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. योग्य उमेदवाराची चाचपणी करून लवकरच उमेदवार जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू व कार्याध्यक्ष माजी आमदार नागो गानार यांनी दिली.
राज्याध्यक्ष कडू म्हणाले की, राज्य शिक्षक परिषदेने आजपर्यंत विदर्भातून अनेक शिक्षक आमदार दिले आहेत. शिक्षकांच्या हक्कासाठी सातत्याने लढणारी ही राज्यातील सर्वांत जुनी व विश्वासार्ह संघटना आहे. येणाऱ्या निवडणुकीत शिक्षक परिषदेचा विजय निश्चित असून, यासाठी संघटनेचे कार्यकर्ते कसोशीने प्रयत्न करतील.
कार्याध्यक्ष नागो गानार म्हणाले, अमरावती विभागातून विधान परिषदेत शिक्षकांचा बुलंद आवाज पोहोचवण्यासाठी शिक्षक परिषदेचाच आमदार निवडून आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी ११ महिन्यांचा कालावधी उपलब्ध असून, या कालावधी उपलब्ध असून, या काळात मी स्वतःसह सर्व पदाधिकारी अमरावती विभागातील ५६ तालुक्यांचा दौरा करणार आहोत…
विभाग कार्यवाह डॉ. पवार यांनी सांगितले की, शिक्षक परिषदेने प्रसिद्धीपासून दूर राहून सूक्ष्म नियोजनाच्या माध्यमातून अमरावती विभागातील सर्व ५६ तालुक्यांमध्ये नोंदणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र आढावा घेऊन निवडणुकीसाठी संघटना सज्ज आहे. बैठकीस राजेंद्र चोथवे, राजकुमार बोनकिले, पूजा चौधरी, नरेंद्र वातकर, रमेश चांदूरकर, शंकरराव पुंड, राजेंद्र गुजरे, डॉ. आशिष निमकर, सुदेशकुमार पाटील, संजय रामावत, निलेश बोडके, योगेश बुधवानी, अंकुश गणगणे, मनोज भडके, अशोक रहाटे, प्रकाश राखुंडे, विनय अंबादे, संतोष पवार, राजेश मदने, अमोल काटेकर, मु’याध्यापिका जयश्री पांडे, प्राजक्ता पेलगाडे, दीपाली सव्वालाखे उपस्थित होते.
(तभा वृत्तसेवा)
