शाळा संरक्षणासह शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी विधानपरिषदेत शिक्षक
परिषदेचा आमदार पाठवण्याचा निर्धार : प्रांताध्यक्ष वेणूनाथ कडू
सोलापूर, दि. २३ (प्रतिनिधी)

शिक्षणाविषयी शासनाचे उदासीन धोरण, शिक्षणावरील खर्चात कपात, अयोग्य शिक्षक प्रशिक्षण कालावधी, सातत्याने शाळा बाह्य कामाचा ताण, शालेय पोषण माहिती सातत्याने मागणी शासनाचे विविध उपक्रम यामुळे शैक्षणिक गुणवत्ता कमी होत आहे. या सर्वासाठी पुणे विधानपरिषद शिक्षक निवडणुकीमध्ये शिक्षक परिषदेचा अभ्यासू प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केल्याची माहिती विभागीय अध्यक्ष सुरेश राठोड यांनी दिली.

हरिभाऊ देवकरन विद्यालय, सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग आयोजित भव्य निर्धार आढावा बैठकीत ते बोलत होते. संरक्षणाइतके महत्व शिक्षणास देऊन एक आदर्श नागरिक घडवत देशाला विकसित राष्ट्र निर्माणसाठी शासनाने कृती आराखडा तयार करून शाळा वाचावा देश वाचावा अभियानात समाविष्ट होण्याचे आवाहन मा शिक्षक आमदार भागवानराव साळुंखे यांनी केले शिक्षणाचा केंद्रबिंदू विध्यार्थी मानून सामाजिक गुणवत्ता व आदर्श राष्ट्र निर्मिती करिता स्वा बोध नागरी कर्तव्य, पर्यावरण संरक्षण, समरसता, व कुटुंब प्रभोधन हे पंच परिवर्तन मुद्दे आत्मसाद करत प्रत्यक्ष जीवनात स्वतः वापर करत इतरांनाही याबत अवगत करावे असे विचार राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी मांडले, विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी शिक्षक परिषदेच्या संघटनात्मक कार्यात सर्वांनी सहभागी होऊन विधान परिषदेत शिक्षक परिषदेचाच आमदार करूया असे मत व्यक्त केले.

विभाग कार्याध्यक्ष अमित कुलकर्णी यांनी पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदान नोंदणी आढाव घेत परिषद नोंदणी मत अग्रभागी असल्याची माहिती दिली तसेच उर्वरित नोंदणी करून घेण्यासाठी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी राज्य कार्याध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, पुणे विभाग संघटणमंत्री सोमनाथ राठोड, सह संघटणमंत्री रामदास अभंग, राज्य कायकारिणी सदस्य बी जी शिंदे, विनायक कुलकर्णी, विभाग काळे, महाराष्ट्रराज्य उपाध्यक्ष संदीप खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष कल्लप्पा फुलारी, सोलापूर जिल्हा खाजगी प्राथ. शिक्षक पतसंस्थेचे माजी सचिव महादेव होमकर, विष्णु पाटील, मारुती तोडकर, बापू माने, दिलीप पाटील , कृष्णात पोतदार, रमेश कोष्टी, बाळासाहेब कनके, कार्तिक चव्हाण, इत्यादी उपस्थित होते. कार्यकामाचे प्रस्ताविक पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड यांनी केले तर आभार विनायक कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *