बोगस शिक्षक मतदार होऊ देणार नाही
माजी आमदार भगवानराव साळुंखे यांचा इशारा
मिरज : पुढारी वृत्तसेवा

शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नसणाऱ्या, धनदांडग्यांना रोखले पाहिजे. शिक्षक मतदार साळुंखे संघातून शिक्षकच भगवानराव आमदार असावा. गतवेळच्या निवडणुकीमध्ये १२ हजार बोगस मतदार होते. या निवडणुकीत एकाही बोगस मतदाराची नोंदणीच होऊ देणार नाही, असा इशारा माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिला.

ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधानपरिषद निवडणूक २०२६ मध्ये होणार आहे. या निवडणुकीत बोगस मतदान होऊ नये यासाठी आमचा कटाक्ष असेल. यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये ज्यांचा मतदार म्हणून संबंधच येणार नाही, अशांची ऐनवेळी चुकीच्या पद्धतीने नोंदणी झाली. सुमारे १२ हजार अशा बोगस मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा असा प्रकार आम्ही रोखणार आहोत. शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये आजच्या अनेक मतदारसंघातून आपण सर्वांनी पाहिलेले आहे, की ज्या लोकांचा शिक्षण क्षेत्राशी काडीचाही संबंध नाही, अशा धनदांडग्यांना कुठे तरी रोखलं पाहिजे. म्हणून शिक्षक मतदार संघातून शिक्षक आमदार असावा, तो शिक्षण क्षेत्रातील चळवळीतील शिक्षक संघटनेतील असावा, हा मुख्य हेतू आहे. यावेळी मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे, बाळासाहेब कणके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *