महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग शिक्षक मतदार संघ शिक्षकांचा भव्य निर्धार मेळावा
सांगली – हिंदूसम्राट प्रतिनिधी
अशोक मासाळ

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधानपरिषद निवडणूक २०२६ निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवार दि. ९/११/२०२५ रोजी मिरज (शेतकरी भवन) येथे घेण्यात येणार आहे.

या मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष मा. वेणुनाथ कडू, कार्यवाह राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, मा. आ. ना. गो. गाणार, मा. आ. भगवानराव साळुंखे, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष आदमसो मुजावर, ए. बी. एस. आर एम च्या सह प्रमुख प्रा. डॉ. सुजाता कुलकर्णी सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य, विभाग कार्यकारिणी सदस्य, सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी, सर्व तालुकाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.या मेळाव्यात पुढील विषयावर मान्यवर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे.

विषय- पुणे शिक्षक मतदार संघ निवडणूक 2026 निर्धार मेळावा

१. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक लढविणे.
शिक्षक मतदार नोंदणी आढावा
सभासद नोंदणी मोहीम
शिक्षकांच्या समोरील आव्हाने
शिक्षकांच्या समस्यांचे संकलन व निवारण
शाळा वाचवा देश वाचवा अभियान
शिक्षण क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेल्या धनदांडग्या इच्छुकांना रोखणे

अशा विविध विषयांवर चर्चा व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी तमाम शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनीनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास अगत्याने उपस्थित राहावे असे आवाहन पुणे विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *