जनप्रवास | मिरज
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्यावतीने पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधानपरिषद निवडणूक २०२६ निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार मेळावा रविवार (दि.९) रोजी घेण्यात येणार आहे. राजेंद्र या मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष वेणुनाथ कडू, कार्यवाह राजकुमार बोनकिले कोषाध्यक्ष सूर्यवंशी, आ. ना गो. गाणार, आ. भगवानराव सांळुखे पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष विजयकुमार माने, शिक्षक कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष आदमसो मुजावर, ए, बी एस. आर एम च्या सह प्रमुख प्रा. डॉ सुजाता कुलकर्णी सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य, विभाग कार्यकारिणी सदस्य, सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी, सर्व तालुकाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यात पुढील विषयावर मान्यवर पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून पुणे विभाग मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक लढविणे तसेच शिक्षक मतदार नोंदणी आढावा, सभासद नोंदणी मोहीम, शिक्षकांच्या समोरील आव्हाने, शिक्षकांच्या समस्यांचे संकलन व निवारण, शाळा वाचवा देश वाचवा अभियान, शिक्षण क्षेत्राचा काडीचाही संबंध नसलेल्या धनदांडग्या इच्छुकांना रोखणे अशा विविध विषयांवर चर्चा व मान्यवरांचे मार्गदर्शन होणार आहे. तरी तमाम शिक्षक शिक्षिका बंधू-भगिनीनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास अगत्याने उपस्थित राहवे असे आवाहन पुणे विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे यांनी केले आहे.
अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह कोषाध्यक्ष व सर्व कार्यकारिणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद सांगली जिल्हा ग्रामीण- सांगली, मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र. माजी आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभागाचे कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, प्रांत सदस्य बजरंग शिंदे, महानगर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणके, सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड उपस्थित होते.
