जयपुर अधिवेशनात महाराष्ट्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ नववे अधिवेशन राजस्थान जयपूर येथे दिनांक 5 ते 7 ऑक्टोबर 2025 रोजी पार पडले.या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही पुतळा उभारण्यात आला होता.अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे संस्थापक माननीय मुकुंदराव कुलकर्णी यांच्या नावाने अधिवेशन ठिकाणी मा *मुकुंदाराव कुलकर्णी प्रवेश द्वार*
पाहण्यास मिळाले. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या आजपर्यंतच्या इतिहासाचा माहिती प्रदर्शन सभा मंडपात आयोजित करण्यात आला होता व या सभा मंडपात माजी *आमदार संजीवनीताई रायकर प्रदर्शनी* सभागृह असे नाव देण्यात आलेले होते. महाराष्ट्राचा अखिल भारतीय स्तरावरती गौरव करण्यात आला. माननीय मुकुंदराव कुलकर्णी यांनी दिलेले योगदान आठवण करून दिली.
राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाना उद्घाटनासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री माननीय भजनलाल शर्मा तसेच शिक्षण मंत्री व अनेक विद्यापीठाचे कुलगुरू राष्ट्रीय कार्यकारिणी व देशभरातील *सुमारे 4000 पेक्षा जास्त प्रतिनिधी* उपस्थित होते या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी माननीय उपमुख्यमंत्री महोदया दिया कुमारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनीताई रायकर प्रदर्शन मंडपाचे उद्घाटन करण्यात आले.
या अधिवेशनामध्ये खालील प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले.
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाचे महामंत्री माननीय महेंद्रजी कपूर यांनी राष्ट्राच्या हितासाठी शिक्षण,शिक्षण हितासाठी शिक्षक आणि शिक्षक हितासाठी समाज या तीन सूत्रावर संघटनात्मक कार्य कसे चालते याबाबत सखोल मार्गदर्शन केले. सध्या देशात 13 लाख 50 हजार सदस्य नोंदणी चा टप्पा आपण पार पाडल्याचे सांगण्यात आले. शिक्षणामध्ये असूरी शक्तीचा शिरकाव झाल्यास समाज विनाशेच्या खायीत लोटतो.शिक्षक बुद्धिजीवी आहे समाज परिवर्तन करण्याची क्षमता शिक्षकांत आहे. भारत बलशाली करत अवघे *विश्वची माझे घर* या उक्तीप्रमाणे आपण आपले आचार विचार अंगीकृत असताना,असूरी शक्तींचा नायनाट करणेही महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन माननीय हनुमान सिंग राठोड यांनी केले. भारताचा गौरवशाली इतिहास पाहता आपण तंत्रज्ञानातही अनेक वर्षापासून प्रगत आहोत याची अनेक उदाहरणे त्यांनी दिली. स्वामी दयानंद सरस्वती यांना जे शिक्षण अभिप्रेत होते त्यातील अनेक गोष्टी NEP 2020 मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. या अधिवेशनामध्ये शिक्षक भूषण या पुरस्काराने तीन शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
1) भगवती शर्मा उदयपूर कुलपती गौतम बुद्ध विश्वविद्यालय ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश
2) प्रोफेसर सुषमा यादव हरियाणा प्राध्यापक दौलतराव कॉलेज दिल्ली विश्वविद्यालय
3) श्री व्ही जे श्रीकुमार, राणी ग्राम जिल्हा पत्तन तित्ती केरळ, अमृता संस्कृत उच्चतम विद्यालय पारिपल्ली जिल्हा कोल्लम मे अध्यापक,
शाल श्रीफळ स्मृतीचिन्ह व एक लाख रुपये रोख या स्वरूपात हा सन्मान करण्यात आला..
या कार्यक्रमासाठी जुनागड पिठासनचे परमपूज्य स्वामी अवधेशनंद गिरी उपस्थित होते. त्यांनी उपदेश करताना भगवान स्वयं,शिक्षित करने के लिए गुरु के माध्यम से प्रकट होते है. यानुसार शिक्षक हे भगवानाचे रूप मानले आहेत म्हणूनच *गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा* या मध्ये गुरुची महती सांगितलेली आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना एक सक्षम आदर्श नागरिक घडवण्यासाठी तयार असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.एकूणच अधिवेशन भव्य दिव्य झाले. देशातील एक सर्वात मोठी संघटना असणाऱ्या या संघटनेचा प्रवास यशाची शिखरे पादांकृत करीत आहे या अधिवेशनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेनेही सक्रिय सहभाग घेतला सदर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. त्याबद्दल सर्वांचेच आभार. या निमित्ताने अधिवेशन कालावधीनंतर राज्यस्थान मधील पर्यटन ठिकाणे पाहण्यात आली यामध्ये प्रामुख्याने अनेकांनी खाटू श्याम मथुरा तसेच जयपूर मधील इतर प्रेक्षणीय ठिकाणांनाही भेट देत राजस्थानी संस्कृती जाणून घेतली *पधारो मारे देश* प्रमाणे आदरा तित्य झाले.
खूप खूप धन्यवाद.
शब्दांकन
या अधिवेशनात शिक्षक परिषदेचे खालीलप्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू, राज्य कार्याध्यक्ष मा आमदार भगवानराव साळुंखे, राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी,
पुणे विभाग,सुरेश राठोड अध्यक्ष , पुणे विभाग, सोमनाथ राठोड,कार्याध्यक्ष , पुणे विभाग,विनायक कुलकर्णी प्रांत , पदाधिकारी, सांगली जिल्हा महिला आघाडी सुजाता कुलकर्णी,परमेश्वर गायकवाड, अध्यक्ष , सोलापूर जिल्हा श्री. दिलीपकुमार पाटील,कार्यवाह , सोलापूर जिल्हा
श्री. अर्जुन खटके उपाध्यक्ष , सोलापूर जिल्हा,भारत माने कार्यकारिणी सदस्य,हेमंत पवार कार्यकारिणी सदस्य
नाशिक विभाग
सचिन पाटील, नाशिक विभाग कार्यवाह, दत्ता वाघे पाटील,नाशिक जिल्हाध्यक्ष, सचिन पाटील, विभाग कार्यवाह, शरद निकम विभाग संघटन मंत्री, राजेश शिंदे जिल्हा कार्यवाह, शंकरराव सांगळे, विभाग उपाध्यक्ष, संजय सावंत,नाशिक शहर, उपाध्यक्ष,
सुनिल आहेर नाशिक विभाग उपाध्यक्ष, विनित पवार,नाशिक शहर कार्यवाह,विजय बडे नाशिक जिल्हा, उपाध्यक्ष, सचिन मेधने, कोषाध्यक्ष,जयंत पगार, जिल्हा सहसंघटनमंत्री,कुंदन शिंदे,नाशिक जिल्हा उपाध्यक्ष संतोष उशीर,नाशिक शहर उपाध्यक्ष श्रीकांत तवर, नाशिक जिल्हा सहकोषाध्यक्ष, प्रा. संजय बागूल, त्र्यंबक मार्कंड
मराठवाडा विभाग
गणेश पवार राज्यकार्याध्यक्ष,काकासाहेब जाधव जिल्हाध्यक्ष शहर छत्रपती संभाजीनगर,
दिलीप कुंदे जिल्हाध्यक्ष ग्रामीण,
विजय फरकाडे जिल्हाकार्यवाह ग्रामीण,अतुल घडमोडे जिल्हाकोषाध्यक्ष,अशोक पवार जिल्हासंघटनमंत्री
मराठवाडा विभाग
गणेश पवार राज्य कार्याध्यक्ष, अनिल घायवट, जिल्हाध्यक्ष ग्रामीण छत्रपती संभाजीनगर प्रा दिलीप कुंदे, जिल्हाध्यक्ष शहर श्री काकासाहेब जाधव, जिल्हाकार्यवाह प्रा विजय फरकाडे, जिल्हाउपाध्यक्ष श्री शामकांत पाचपुते, जिल्हा कोषाध्यक्ष प्रशांत मेरत, जिल्हासंघटन मंत्री प्रा अशोक पवार, जिल्हाकोषाध्यक्ष ग्रामीण श्री अतुल घडमोडे
शब्दांकन
राजेंद्र सूर्यवंशी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद

