एकच निर्धार भ्रष्टाचार मुक्त शिक्षण क्षेत्रासाठी, शिक्षक मतदारसंघातून शिक्षकच होणार आमदार

राजेंद्र नागरगोजे यांच्या सारख्या सक्षम उमेदवाराचे नाव आघाडीवर : प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू

बंधुता न्यूज नेटवर्क

मिरज : शिक्षण क्षेत्रामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या शिवाय राज्यातील कोणतेही शिक्षक अथवा पदवीधर मतदारसंघातील आमदाराने याबाबत आवाज उठवला नाही, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी निर्धार करण्यात आला आहे.

भ्रष्टाचार मुक्त शिक्षण क्षेत्रासाठी एक च निर्धार शिक्षक मतदारसंघातून शिक्षक होणार आमदार. पुणे शिक्षक मतदार संघातून संघटनेचे पुणे विभागाचे कार्याध्यक्ष मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे नाव यांचे सक्षम

उमेदवार म्हणून नाव आघाडीवर आहे. पुणे शिक्षक मतदार संघातील सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन उमेदवारी जाहीर करण्यात येणार आहे अशी माहिती, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद संघटनेचे प्रांत अध्यक्ष प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी दिली आहे. मिरज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिक्षकांच्या निर्धार मेळाव्यानंतर प्रांत अध्यक्ष वेणूनाथ कडू हे पत्रकारांशी बोलत होते.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे विभाग व सांगली जिल्हा ग्रामीण, सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र यांच्या वतीने पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधानपरिषद निवडणूक २०२६ निमित्ताने भव्य शिक्षक निर्धार

मेळावा मिरज येथील शेतकरी भवन येथे घेण्यात आला. पुणे शिक्षक विधानपरिषद मतदार संघातून पुणे विभागाचे कार्याध्यक्ष, मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे हे निवडणूक लढवण्यास इच्छुक असून निवडणूक लढवण्याची त्यांनी तयारी केली आहे, आणि त्यांचं नाव आघाडीवर आहे.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र हेतूने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ तयार केला. यापूर्वी शिक्षक मतदार संघातून शिक्षक आमदार निवडून येत होता. मात्र राजकीय पक्षांच्या घुसखोरीनंतर धन दांडगे आणि शिक्षण क्षेत्राचा संवर्धन असणारे लोकसुद्धा या मतदारसंघातून निवडून येऊ

लागले. त्यामुळे राज्यात शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला आहे. मात्र शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचाराच्या बाबत शिक्षक आमदार किंवा पदवीधर आमदारांनी कोणत्या प्रकारचा आवाज विधिमंडळात उठवला नाही. फक्त महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेचे आमदारच भ्रष्टाचार विरोधात लढा देत आलेले आहेत. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्य असणारे आणि भ्रष्टाचाराला विरोध करणाऱ्या शिक्षक उमेदवारालाच उमेदवारी देण्याचा निर्धार संघटनेने केला आहे, असेही प्रांत अध्यक्ष

वेणूनाथ कडू यांनी सांगितले.

मिरजेत यशस्वीरित्या संपन्न झालेल्या शिक्षक मेळाव्यासाठी प्रांत अध्यक्ष मा वेणुनाथ कडू, कार्यवाह राजकुमार बोनकिले, कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, माजी आमदार भगवानराव साळुंखे, पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, उपाध्यक्ष विजयकुमार माने कार्यवाह बाळासाहेब चोपडे कोषाध्यक्ष आदमसो मुजावर, ए,

बी एस. आर एम च्या सह प्रमुख प्रा. डॉ सुजाता कुलकर्णी, प्रांत सदस्य बजरंग शिंदे, महानगर सांगली मिरज कुपवाड महानगर पालिका क्षेत्राचे संघटन मंत्री बाळासाहेब कणके सर, सांगली मिरज कुपवाड  महापालिकेचे क्षेत्राचे अध्यक्ष नवनाथ लाड आणि सर्व प्रांत कार्यकारिणी सदस्य, विभाग कार्यकारिणी सदस्य,

सांगली जिल्हा ग्रामीण सांगली मिरज कुपवाड महापालिका क्षेत्र सर्व कार्यकारिणी, सर्व तालुकाध्यक्ष कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

<img src=”“>

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *