महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद
-मा शिक्षण उपसंचालक कोल्हापूर यांच्या समवेत बैठक
शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय होणे आवश्यक – वेणूनाथ कडू
शैक्षणिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने अधिक सक्रिय होणे आवश्यक असल्याचे मत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी व्यक्त केले ते शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग आयोजित सहविचार सभेत बोलत होते. अनेक प्रलंभी मान्यता नियमानुसार देण्यात याव्यात तसेच शिक्षणधिकारी स्तरावर प्रश्न प्रलंभीत राहू नयेत यासाठी सातत्याने उपसंचालक कार्यालयाणने पाठपुरावा करावा असे विचार मा शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे यांनी व्यक्त केले.
शैक्षणिक प्रश्न तातडीने सोडवण्याचे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी संघटनेने सहकार्य करावे अशी अपेक्षा मा उपसंचालक प्रभावती कोळेकर मॅडम यांनी व्यक्त केले.
यावेळी शालार्थ आय डी मान्यता व इतर पद भरती मान्यता या समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर देण्यात येतील, थकीत वैद्यकीय बिले, पी एफ बिल व इतर फरक बिल तपासणी सुरु आहे. तसेच अपात्र बिल शेरासह संबंधितना कळवले जाईल अशी माहिती देण्यात आली.
राज्य कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी आभार मानले. या बैठकीसाठी पुणे विभाग अध्यक्ष सुरेश राठोड, विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, विभाग कार्यवाह बाळासाहेब चोपडे, विभाग उपाध्यक्ष विजय माने, राज्य कार्यकारिणी सदस्य बी जी शिंदे, महिला आघाडी सुजाता कुलकर्णी, कोल्हापूर जिल्हा कार्यवाह कृष्णात पोतदार उपस्थित होते.
