शिक्षण विभागातील थकीत देयके अदा
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या मागणीला यश
नगर, दि. १ (प्रतिनिधी) – मार्चच्या शेवटी जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे तीन वर्षांपासूनची सर्व प्रकारची थकीत पुरवणी, वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले व सातव्या वेतन आयोगाचे १ ते ४ पर्यंतचे थकीत हप्ते देण्यात आले. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश आले आहे. ज्ञानदेव बेरड, शिवाजीराव घाडगे, प्रसाद सामलेटी, वैभव शिंदे, बाबासाहेब गांगर्डे, गोविंद धर्माधिकारी, प्रसाद नंदे, गोवर्धन पांडुळे, अशोक जेम्स, विजया गायकवाड, आर. एम. ठाकरे आदी उपस्थित होते.
याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधीक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर व कार्यालय अधीक्षक सुभाष कराळे यांचा जिल्हा परिषदेत सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील पंडित, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, प्रा. शिक्षक परिषदेच्या वतीने मागील तीन वर्षांपासूनची सर्वप्रकारची थकीत देयके मिळण्याची सातत्याने मागणी सुरू होती. संघटनेच्या पाठपुराव्याला प्रतिसाद देत शिक्षणाधिकारी कडूस व वेतन पथक अधीक्षक म्हस्के यांनी मार्चच्या शेवटी सर्व बिले निकाली काढण्याचे
आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळून सर्व थकीत देयके शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्तांना मिळण्यासाठी सर्व देयके मंजूर करून कोषागार कार्यालयात सादर केलेली आहेत. ही सर्व देयके सर्वांच्या खात्यावर वर्ग होण्याचे काम सुरू झाले आहे.
