शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याला यश
शिक्षण विभागातील थकीत देयके अदा
समाचार / नगर – दि. २ मार्चच्या जिल्हयातील कार्यालय अधीक्षक सुभाष शेवटी कराळे यांचा जिल्हा परिषदेत शिक्षक, सत्कार करण्यात आला. व सेवानिवृत्त या सत्कार सोहळ्यासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुमारे तीन वर्षापासूनची सर्व प्रकारची थकीत पुरवणी, वैद्यकीय, रजा रोखीकरण बिले व सातव्या वेतन आयोगाचे १ ते ४ पर्यंतचे थकीत हप्ते मिळण्याची कार्यवाही पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, वेतन पथक अधिक्षक रामदास म्हस्के, उपशिक्षणाधिकारी आकाश दरेकर, संध्या भोर व मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनिल पंडित, शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक
शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे, शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा. ज्ञानदेव बेरड, शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवाजीराव घाडगे, कोषाध्यक्ष प्रसाद वैभव शिंदे, सामलेटी, बाबासाहेब गांगर्डे, गोविंद धर्माधिकारी, प्रसाद नंदे, शिक्षकेतर संघटनेचे गोवर्धन पांडुळे, अशोक जेम्स, विजया गायकवाड, आर. एम. ठाकरे आदी उपस्थित होते.
प्रा. सुनिल पंडित म्हणाले की, इतिहासात पहिल्यांदाच मार्चच्या शेवटी सर्व थकीत देयके मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधिक्षक यांनी केलेल्या कामाच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हे शक्य झाले आहे. दिलेला शब्द अधिकाऱ्यांनी पाळला असून, अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सन्मान होण्यासाठी त्यांचा सत्कार केला गेल्याचे त्यांनी, सांगितले. बाबासाहेब बोडखे यांचेही भाषण झाले.
