शिक्षक परिषदेतर्फे शुक्रवारी धरणे

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे शुक्रवारी ३० मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ पर्यंत नागपूर येथील संविधान चौकात विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
शून्य या धरणे आंदोलनात १५ मार्च २०२४ च्या अशैक्षणिक शासन निर्णयानुसार २०२४-२०२५ चे संच निर्धारण केल्यामुळे
अनेक मराठी भाषिक शाळेतील शिक्षकांची पदे कमी झाली. काही शाळांमध्ये शिक्षक पदे दाखविण्यात आले. त्यामुळे शिक्षकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *