इस्लामपूर : आयुक्तांना निवेदन देताना माजी आमदार भगवानराव साळुंखे व आणि शिष्टमंडळ.

शिक्षक पदवीधर मतदार नोंदणीतील त्रुटींचा निपटारा होणार : साळुंखे

इस्लामपूर : प्रतिनिधी विभागीय आयुक्तांनी शिक्षक व पदवीधर नोंदणी प्रारूप यादीतील चुका व त्रुटींचा निपटारा करूनच दि. ३० डिसेंबर रोजी पहिली यादी घोषित केली जाईल. तसेच पुरवणी यादीमध्ये १०० टक्के नोंदणीचे उद्दिष्ट प्रशासकीय यंत्रणेमार्फत करून घेण्याचे मान्य केल्याची माहिती माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी दिली. साळुंखे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय महसूल विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेतली. मतदार नोंदणीविषयक निवेदन दिले. शिक्षक परिषदेने सहविचार सभेने प्रशासकीय यंत्रणेनेच मतदान नोंदणी करणे बंधनकारक असल्याची निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार आयुक्तांनी खास मोहिमेद्वारे ५ जिल्ह्यांत प्रशासकीय यंत्रणा राबवून पहिल्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त नोंदणी करून घेतली आहे. पाच जिल्ह्यांत ४७ हजार १६४ शिक्षकांनी मतदार नोंदणी केली आहे. यामध्ये अनेक त्रुटी असून त्यांचा निपटारा करून घेण्यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच १०० टक्के मतदार नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यास चालना देण्याचेही आश्वासन दिले. यावेळी विभागीय अध्यक्ष राजेंद्र नागरगोजे, गुलाबराव गवळे, गुलाबराव डाळींबकर, रतन पाटील, भारत खाडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *