विविध मागण्यांसाठी शिक्षक परिषदेची २० पासून धरणे
बांबवडे / प्रतिनिधी :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने शिक्षणक्षेत्रातील विविध मागण्या संदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात दि. २० रोजी धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. शासनाकडे प्रामुख्याने केलेल्या मागण्या अशा, शिक्षकांना वेतन अनुदानाऐवजी प्रति विद्यार्थी अनुदान द्यावे, या संदर्भात गठीत केलेली समिती त्वरित बरखास्त करावी, नवीन पारिभाषित अंशदान योजना बंद करावी, अनुदान पात्र शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदान द्यावे, शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावे, संगणक शिक्षकांना कायम स्वरुपी सेवेत घ्यावे, १०, २०, ३० वर्ष सेवेनंतर विनाअट सर्वाना आश्वासित प्रगती योजना लागू करावी, सातव्या वेतन आयोगातील. त्रुटींची पूर्तता करावी. या मागण्यांसाठी परिषदेने धरणे आंदोलनाचा इशारा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर बांधवानी राहावे, असे आवाहन शिक्षक परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पंडित पवार व पुणे विभाग कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले आहे.
