राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण नूतन कार्यकारिणी निवड

कार्यकारिणी निवड बैठकीत बाळासाहेब लामखडे यांची जुन्नर तालुकाध्यक्षपदी निवड
लोकमत न्यूज नेटवर्क

ओतूर : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष नीलेश काशीद यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेमध्ये जुन्नर तालुक्याच्या नूतन कार्यकारणीची नियुक्तीपत्रे देण्यात आली. कार्यकारिणी निवड समितीच्या बैठकीमध्ये बाळासाहेब रतन लामखडे यांची जुन्नर तालुकाध्यक्षपदी तर प्रणव नंदकुमार काळे यांची कार्यवाहपदी बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर कैलास महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण जुन्नर तालुक्याची नूतन कार्यकारिणी. बाबुराव शिंदे, रमाकांत शंकर फापाळे, अभिजीत अशोक भुजबळ यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्याध्यापक संघाचे संजय वाघ यांनी केली.

कार्यकारणीच्या इतर सदस्यांमध्ये शरद मनसुख, विठ्ठल गडगे यांची कार्याध्यक्षपदी तर सहकार्यवाह म्हणून प्रशांत अहिर व अविनाश शेटे यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा शिवनेर विद्यालय, धोलवडचे मुख्याध्यापक समीर वामन यांनी केली. कैलास करपे यांच्या हस्ते कार्यालय मंत्री म्हणून महादेव डिसले, ज्ञानेश्वर वाघ, संजय लांडे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यकारिणी सदस्य म्हणून ज्ञानेश्वर नायकोडी, विजय चव्हाण, संदीप शेलार, काशिनाथ वाकचौरे, रमेश जाधव, व्यंकट मुंडे, प्रशांत थोरात, संजय उंडे यांची नियुक्ती करण्यात आली. महिला आघाडी प्रमुख म्हणून रोहिणी वाकचौरे, स्मिता कानडे, अनुपमा पाटील, संगीता गाडेकर, शीला पोखरकर यांच्याकडे पदभार देण्यात आला. कोषाध्यक्षपदी दीपक धनराज कार्यकारिणीला मार्गदर्शक म्हणून राजेंद्र पाटील तर संघटन मंत्री म्हणून अशोक शहाणे, समीर वामन, इम्तियाज मुलानी, पाटील, भाऊ वेडे, लक्ष्मण डुंबरे, ज्ञानेश्वर दत्तात्रय गुंजाळ, डॉ. दीपक घाडगे, महेंद्र सस्ते, शरद ताठे यांची नियुक्ती करण्यात देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. सूत्रसंचालन कैलास शिंदे यांनी पुणे जिल्हा ग्रामीणचे संघटन मंत्री केले तर प्रणव काळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *