महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा कार्यालयाचे थाटात उदघाटन.

वर्धा जिल्हा प्रतिनिधी : प्रा. दिनेश राठोड

वर्धा : वर्धा येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद वर्धा जिल्हा कार्यालय उघडण्यात आले. या कार्यालयाचे उदघाटन राज्याचे कार्याध्यक्ष तथा माजी शिक्षक आमदार मा. श्री. नागो गाणार सर यांच्या हस्ते व विभागाचे विभागीय अध्यक्ष मा. श्री. अजय वानखेडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. सुधीर राठोड, जिल्हा कार्यवाह श्री. मारोती सयाम, जिल्हा कार्याध्यक्ष श्री दीपक ढगे, जिल्हा उपाध्यक्ष सौ सुरेखा नगराळे, व प्रमोद गुढधे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख कु. शुभांगी चिकटे, विभाग सहकार्यवाह सौ. मनीषाताई साळवे, जिल्हा सहकार्यवाह श्री पवन निनावे, वर्धा तालुका अध्यक्ष श्री हेमंत भुरे, जिल्हा संघटन मंत्री प्रवीण गजभिये व अन्य सभासद पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना माजी आमदार सन्मा. श्री. नागो गाणार सरांनी हे कार्यालय म्हणजे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या  अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण झाले पाहिजे व या ठिकाणावरून शिक्षकांच्या समस्येचे निराकरण होईल यात कोणतेही संशय नाही. असा आत्मविश्वास व्यक्त केला. कार्यालयाचे उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *