महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन
शिक्षकांना न्याय व हक्क मिळवून देणारी एक मान्यता प्राप्त संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे नाव स्मृती पटलावर येते.
अशा या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची मालेगाव तालुकास्तरीय बैठकीचे आयोजन आज दिनांक 25 डिसेंबर 2025 रोज रविवारला सकाळी 11: 00 वाजता. अनिल पुंडलिक बळी यांचे निवासस्थान यशोदाई निवास सोम-पुष्प टॉवर ,अकोला रोड आय एम ए हॉल समोर मालेगाव जिल्हा वाशिम येथे आयोजित केली होती.
मालेगाव तालुक्यातील शिक्षक बंधू कार्यकर्ते उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती राज्य सरकार्यवाह राजकुमार
बोनकिले सर,जिल्हाध्यक्ष अनिल बळी, उपाध्यक्ष गजानन कुबडे, तालुक्यातील कार्यकर्ते श्री संजीव कळणू भोंडणे, कैलास शिंदे, पांडुरंग वैद्य, डीगांबर मोकळे, पी एम कुटे, पी पी घाटोळ, मो अशपाक शेख हमजा,इत्यादी शिक्षक बंधू उपस्थित होते. सर्व प्रथम महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे संस्थापक अध्यक्ष स्व. वसंतराव काणे सर यांचे 23 तारखेला दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर बैठकीला सुरवात झाली.
आज आयोजित केलेल्या बैठकीला मार्गदर्शक म्हणून राज्य कार्यकारिणीचे सरकार्यवाह राजकुमार बोनकीले सर,
यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तालुका कार्यकारिणी गठीत करावयाची आहे.त्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्वानुमते मालेगाव तालुका अध्यक्ष म्हणून संजीव कळनू भोंडणे ना ना मुंदडा विद्यालय मालेगाव यांची निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी येत्या रविवारी घोषित करण्याचे सर्वानुमते ठरले.
आजच्या बैठकीचे संचालन गजानन कुबडे यांनी केले.कैलास शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने बैठक संपली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *