‘मराशिप’ संघटनेचे धरणे आंदोलन यशस्वी
पुण्य नगरी / प्रतिनिधी
चामोर्शी :
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद संघटनेच्या वतीने नागपूर येथील यशवंत स्टेडियममध्ये विधिमंडळ अधिवेशनात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. राज्य अध्यक्ष वेनुनाथ कडू, माजी विधान परिषद आमदार नागो गाणार व माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनातील एकूण २२ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांना देण्यात आले.

अशैक्षणिक शासन निर्णय १५ मार्च २०२४ रद्द करा, टीईटी पात्रता परीक्षा रद्द करा. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा. शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित करणारा वित्त विभागाचा शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २००५ व शिक्षण विभागाचा शासन निर्णय २९ नोव्हेंबर २०१० रद्द करा. सरल आणि यु-डायस मधील वयाची शितलता असावी. दरवर्षी नवीन टॅब उपलब्ध करून द्यावा आदींसह विविध मागण्यांचे आले. यावेळी राज्य सरकार्यवाह राजकुमार बोनकिले, राज्याचे कोषाध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी, संघटन मंत्री किरण भावठाणकर, महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी, कार्यालय मंत्री निरंजन गिरी उपस्थित होते.

धरणे आंदोलनाची जबाबदारी संपूर्ण नागपूर विभागाने स्वीकारून यशस्वी केले. यावेळी अजय वानखेडे, सुभाष गोतमारे, संतोष सुरावर, रामदास गिरटकर, मधुकर मुपीडवार, पुंडलिक नाकाडे, सुधीर वारकर, मनीषा वाकोडे, मनीषा साळवे, रंजना कावळे, हेमंत बेलखोडे, प्रशांत वैद्य, सरिता सोनकुसरे, अशोक वैद्य, गुणेश्वर कुंडे, ललिता हलमारे, रत्ना चौधरी, वनिता एलावार, शारदा श्रीरामे, तुलाराम मेश्राम, गणेश चिखले, सोपान घुले, दीपक ढगे, दिलीप मेकेलवर, सुरेश रोते, सुभाष घोरपडे, घनश्याम मनबटूलवार, स्नेहल नागरे, राजेंद्र पटले, प्रमोद
बोडे, रूपेंद्र बसेशंकर, मीनानाथ सातपुते, राजू तांदुरकर, चंद्रकांत चौधरी, मुकेश भांगे, भाग्यश्री नकाते, सतीश कचरे, अतुल टेकाडे, गुणवंत अवचितकर, वसंत हिवसे, ज्योती बोकडे, सुधीर राठोड, मारुती सयाम, प्रदीप छलके, गोपाल सोनी, शुभांगी चिकटे, अंगेश बेहलपाडे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *